Last Update:
 
विशेष पुरवण्या

बारावी विज्ञान शाखेतील 70 टक्केपेक्षा अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांना ही चांगली संधी आहे. सध्या इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रिया व बी ई नंतर नोकरीच्या संधी यांचा विचार केल्यास भारतीय नौदलात या एन्ट्री स्कीममधून बी. टेक. पदवी प्राप्त होते व नोकरीच्या हमीसह, "परमनंट कमिशन' मिळवून देशसेवाही करता येते. पात्र उमेदवारांनी "एम्प्लॉयमेंट'मधील पुढील जाहिरातीनुसार या संधीचा विचार करावा...

Friday, June 08, 2012 AT 10:11 PM (IST)

कळंगुट मतदारसंघात प्रचारासाठी मतदारांचे उंबरठे झिजविले जात आहेत. एरवी हा मतदारसंघ कॉंग्रेसचा बालेकिल्ला, पण मतदारसंघ फेररचनेनंतर परिस्थिती बदलली आहे. "भाजप'ने येथे जोर लावल्याने झुंज रंगणार आहे. कॉंग्रेसचे आग्नेल फर्नांडिस येथून निवडणूक लढवत असून, भाजपने मायकल लोबो यांना उमेदवारी दिली आहे. या दोघांमध्येच थेट लढत होणार आहे. फर्नांडिस हे अनुभवी असून, त्यांची ही तिसरी विधानसभा निवडणूक आहे.

Tuesday, February 14, 2012 AT 03:15 AM (IST)

पणजी, ता. 13 - विधानसभा निवडणुकीत विविध पक्षांनी उमेदवारी डावलल्याने दुखावलेले चाळीस उमेदवार पक्षाला "धडा शिकवण्यासाठी' निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

Tuesday, February 14, 2012 AT 03:00 AM (IST)

गोव्याच्या इतिहासात अनेक सरकारे पडली, पाडली गेली. पण एक सरकार असे पडले की तशा पद्धतीने पुन्हा कधीच कोणाचे सरकार पडले नाही. इतिहासात तो एकमेव प्रकार होता. गोव्याला अस्थिरतेचे ग्रहण खरे तर 1990 पासून लागले. 1990 ते 2000 या दहा वर्षांच्या काळात 13 मुख्यमंत्री झाले, म्हणजे 13 सरकारे झाली. तत्पूर्वी पहिल्या तीन निवडणुकांत म्हणजे 1963, 1967 आणि 1972 साली भाऊसाहेब बांदोडकरांचे सरकार आले होते.

Tuesday, February 14, 2012 AT 02:45 AM (IST)

पणजी, ता. 10 ः राज्यातील विधानसभा निवडणुकीला खऱ्या अर्थाने आता रंग भरू लागला आहे. उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात तेथील विकासकामांचा मुख्य मुद्दा बनवला असला तरी राज्यस्तरावर गाजलेल्या शिक्षणातील मातृभाषा माध्यम, विभागीय आराखडा या मुख्य अंगांनाही स्पर्श केला आहे, पण ही सगळी सावधता बाळगूनच.

Saturday, February 11, 2012 AT 04:00 AM (IST)

पणजी, ता. 10 - राज्यात कॉंग्रेसची सत्ता आल्यावर पुढचा मुख्यमंत्री कोण असेल, याची खेळी कॉंग्रेसजनांकडून आतापासून सुरू झाली आहे. 18 वर्षांचा मुख्यमंत्रिपदाचा अनुभव असलेल्या प्रतापसिंह राणे यांनाच हे पद मिळावे, यासाठी त्यांचे पुत्र आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे प्रयत्न लपून राहिलेले नाहीत.

Saturday, February 11, 2012 AT 04:00 AM (IST)

पणजी, ता. 10  ः निवडणुकीच्या प्रचाराला हळूहळू वेग चढू लागला आहे. सांताक्रूझ मतदारसंघात तर वेगाने प्रचार सुरू आहे. प्रचारासाठी लोकांची गरज पडत असल्याने एका व्यक्तीसाठी रोज पाचशे रुपये आणि जेवणाची व्यवस्था, अशी ऑफर दिली जात आहे. असाच प्रकार कुंकळ्ळी मतदारसंघातही सुरू आहे. तेथे प्रचार करण्यासाठी रोज एका व्यक्तीला हजार रुपये दिले जात असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यासाठी काही कामगार रोजचे काम सोडून आपल्या भागात प्रचारासाठी फिरू लागले आहेत.

Friday, February 10, 2012 AT 10:49 PM (IST)

पणजी, ता. 10  ः कॉंग्रेसने अखेर आपल्या प्रचाराची धुरा 18 वर्षे मुख्यमंत्रिपदी राहिलेल्या आणि राज्य प्रशासनासह राज्याच्या सर्व प्रश्‍नांची सखोल माहिती असलेल्या प्रतापसिंह राणे यांच्याकडे दिली आहे. मुख्यमंत्रिपदी दिगंबर कामत आहेत, तर प्रचार प्रमुखपदी माविन गुदिन्हो होते. त्यामुळे गुदिन्होंच्या की कामत यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस निवडणूक लढवेल असा प्रश्‍न निर्माण झाला होता.

Friday, February 10, 2012 AT 10:46 PM (IST)

पणजी, ता. 27 ः देशात इतर राज्यांच्या तुलनेत गोवा हे एकदम छोटे राज्य आहे. या छोट्याशा राज्यात तब्बल चाळीस आमदार येथील नागरिकांचे प्रतिनिधित्व करतात. देशातील एखाद्या राज्याच्या जिल्ह्याएवढे गोव्याचे क्षेत्रफळ आहे. इतर राज्यांचे क्षेत्रफळ मोठे आहे. त्यामुळे आमदारांची आणि मंत्र्यांची मोठी संख्या समजून घेता येऊ शकते.

Saturday, January 28, 2012 AT 03:45 AM (IST)

माशेल, ता. 27 ः प्रियोळ मतदारसंघ हा भौगोलिकदृष्ट्या डोंगर-दऱ्यांचा, कुळागारांनी व्यापलेला आणि विकासाच्या दृष्टीने मागासलेला असा मतदारसंघ आहे. सुरुवातीची 17 वर्षे आणि भाजपची राजवट सोडल्यास हा मतदारसंघ विरोधी पक्षाकडेच राहिला. त्यामुळे या मतदारसंघाचा तसा विकास झालेला.

Saturday, January 28, 2012 AT 01:30 AM (IST)

वाळपई, ता. 27 ः वाळपई मतदारसंघाचे आमदार विश्‍वजित प्रतापसिंह राणे यांनी गेल्या पाच वर्षांत वाळपई शहराबरोबरच ग्रामीण भागातसुद्धा विविध विकासकामे पूर्ण केली आहेत. त्यांनी दिलेल्या आश्‍वासनांची बहुतेक कामे पूर्ण केली आहेत. वाळपई पालिका क्षेत्रातील सर्व प्रभागांतील रस्त्यांचे हॉटमिक्‍स डांबरीकरण झाले. वाळपईत डॉ. आमशेकर पुलापासून ते पेट्रोल पंपापर्यंत वाळपई, फोंडा व पणजी मुख्य रस्ता आदी रस्त्यांचे रुंदीकरण व सौंदर्यीकरणही पूर्ण झाले.

Saturday, January 28, 2012 AT 01:15 AM (IST)

केपे, ता. 27 ः केपे मतदारसंघाचे आमदार या नात्याने लोकांच्या सेवेला वाहून घेताना लोकांच्या ज्या गरजा व मागण्या होत्या त्या पूर्ण करण्याचे आटोकाट प्रयत्न केले असून निवडणुकीवेळी जी जी आश्‍वासने आपण दिली होती ती आपण पूर्ण केल्याचे केपे मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर यांनी सांगितले. या मतदारसंघातील अति दुर्गम अशा बार्शे, मोरपिर्ला, बेतूल, कावरे-पिर्ला, फातर्पा या पंचायत क्षेत्रात वीज व पाणी पुरवठ्याची सोय कोली.

Saturday, January 28, 2012 AT 01:00 AM (IST)

पणजी, ता. 2   ः इफ्फीत सुधारणांचे पर्व सुरू झाले असून, स्वतःहून महोत्सवात चित्रपट दाखवण्यासाठी संपर्क साधणाऱ्यांची संख्या वाढते म्हणजे इफ्फीचा दर्जा वाढतो आहे व तसे संदेश जगाच्या पाठीवर जात आहेत. ग्लॅमर आले नाही तरी सृजन येथे येत आहेत, असा दावा प्रसिद्धी निर्माते विधू विनोद चोप्रा यांनी आज येथे केला.  श्री.

Saturday, December 03, 2011 AT 12:29 AM (IST)

पणजी, ता. 1 ः भारतातील बालकांना ग्रासणारी गरिबी या विषयावरील "अनादर प्लॅनेट' या विषयावरील ब्रिटनमधील निर्माते जॅमी नटगेन्स यांच्या लघुपटाला इफ्फीतील शॉर्ट फिल्म सेंटरचा सोनेरी दिव्याचे पहिले बक्षीस मिळाले. स्मिता भिडे यांनी हा लघुपट दिग्दर्शित केला असून आंतरराष्ट्रीय स्पर्धा वर्गवारीत त्यांचा चित्रपट अव्वल ठरला.  गोवा मनोरंजन सोसायटीने आयोजित केलेल्या या स्पर्धेचे परीक्षण दिग्दर्शक बासू चटर्जी यांच्या नेतृत्वाखालील परीक्षक मंडळाने केले.

Friday, December 02, 2011 AT 02:00 AM (IST)

पणजी, ता. 1   ः संपूर्ण पूर्वांचलमध्ये हिंदी सिनेमावर बंदी आहे. थिएटर्सही फार कमी आहेत. परंतु गेल्या वर्षी मी इफ्फीत प्रतिनिधी म्हणून आलो आणि यंदा माझा चित्रपट इंडियन पॅनोरमातून देश विदेशी प्रतिनिधी पाहात आहेत. गोवा इफ्फीने खूप समाधान दिले आणि व्यासपीठही मिळाले. मणिपुरी चित्रपट "फी जिगी मणी' या चित्रपटाचे दिग्दर्शक ओ गौतम सिंग यांचे हे भावपूर्ण उद्‌गार आहेत.

Friday, December 02, 2011 AT 01:45 AM (IST)

कॅ न्सरपीडित तिझियानो तेरझानी याचे जगायचे थोडकेच दिवस राहिलेले आहेत. काही अंतरावर उभा असलेला मृत्यू हा "मित्र आहे, आयुष्यात घडायची असलेली एक नवीन गोष्ट आहे,' अशी प्रगल्भ जाणीव त्याच्या मनात रुजली आहे.

Friday, December 02, 2011 AT 01:30 AM (IST)

स्व स्त भोजन नाही, चहा-नाश्‍ताही महाग. साध्या पाण्याच्या बाटलीला आयनॉक्‍स प्राकारातील जुन्या गोमेकॉ इमारतीत एक दर, तर प्रांगणात दुसरा दर. पाच-दहा रुपयांचा फरक ते का? शिवाय वाहतूक व्यवस्थेचा घोळ, प्रतिनिधीच नव्हे तर पाहुण्यांचे आतिथ्य बरोबर केले जात नाही. एक ना हजार तक्रारी तरीही एकच सूर, एकमताचा ठराव "इफ्फी गोव्यातच राहावा' ओपन फोरममध्ये यू. राधाकृष्णन यांनी मंजूर करून घेतलेला.

Friday, December 02, 2011 AT 01:00 AM (IST)

पणजी, ता. 1 ः लोकप्रशंसा हा चित्रकर्मींसाठी सर्वात मोठा पुरस्कार असतो, असे उद्‌गार "सेंगदल' चित्रपटाच्या दिग्दर्शिका लीना मनीमेकलाई यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या, हा चित्रपट म्हणजे रामेश्‍वरच्या धनुष्यकोडी येथील मच्छीमारांच्या संघर्षाचा दस्तऐवज आहे.  धनुष्यकोडी आणि रामेश्वरम मंडपम शिबिरातील मच्छीमार आणि शरणार्थींनी या चित्रपटात अभिनय केला असून लेखन प्रक्रियेतही सहभाग घेतला आहे, अशी माहिती देऊन त्या म्हणाल्या, सेंगदल म्हणजे मृत सागर.

Thursday, December 01, 2011 AT 11:40 PM (IST)

पणजी, ता. 30 ः देशात हाताळण्यासाठी विषय अनेक आहेत, पण चित्रपटनिर्मितीसाठी वित्त पुरवठा लागतो आणि तो सहजासहजी मिळत नाही. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) पाठिंबा देत असल्याने स्थानिक भाषांत दर्जेदार चित्रपट निर्मिती होते, अशी माहिती "ही' या भोजपुरी चित्रपटाचे दिग्दर्शक मंगेश जोशी यांनी दिली. यावेळी त्यांच्यासोबत बालकलाकार मदन देवधर आणि चित्तरंजन गिरी होते. जोशी म्हणाले, सुरवातीला चित्रपटाचे नाव हिरो ठरविले होते.

Thursday, December 01, 2011 AT 02:00 AM (IST)

पणजी, ता. 30 ः दिल्ली, आग्रा आणि जयपूर या त्रिकोणावर यापुढे चित्रपट करणार आहे. त्याची पूर्वतयारी व पटकथा तयार आहे, अशी माहिती "यू डोण्ट बिलॉंग' चित्रपटाचे दिग्दर्शक स्पंदन बॅनर्जी यांनी आज येथे दिली. यावेळी त्यांच्यासोबत पटकथेच्या लेखिका रूपलीना बोस होत्या.  बॅनर्जी म्हणाले, या चित्रपटाचा प्रिमिअर न्यूयॉर्कमधील ट्रायबेका महोत्सवात झाला. आता चीनमधील महोत्सवात सध्या चित्रपट दाखविण्यात येत आहे. संगीताचा प्रवास मांडणारा हा चित्रपट आहे.

Thursday, December 01, 2011 AT 01:30 AM (IST)

नवरा-बायकोमधील बेदीली घटस्फोटापर्यंत पोचते तेव्हा त्या दुःखाचे चटके त्या दोघांना सोसावे लागतातच, परंतु त्यात सर्वांत जास्त परवड होते ती त्यांच्या मुलाची. आईवडिलांच्या प्रेमाला आचवल्याने मुलांचे उद्‌ध्वस्त होणारे भावविश्‍व सावरावे कसे, त्यांच्या प्रेमाची भूक भागवावी कशी, असे अस्वस्थ प्रश्‍नही या परवडीला लगटून येतात.

Thursday, December 01, 2011 AT 01:15 AM (IST)

कित्येक वर्षे अंतरातच कुठेतरी गाडून गेलेल्या प्रेमाला आयुष्याच्या संध्याकाळी अकस्मातच आलेली जाग, त्यातून स्वतःचाच धांडोळा देत सामोरे येणारे क्षण आणि ते सारे उद्‌ध्वस्त होत जाण्याचा प्रवास अस्वस्थ तरलपणाने टिपणारा "व्होल्कानो' हा आइसलॅंडचा चित्रपट. थोडा संथ वाटणारा पण मनाचा ठाव घेणारा.   हेन्स (थिओडोर ज्युलिउसान) सेवानिवृत्त झाल्यानंतर अंगावर आलेल्या प्रचंड मोकळ्या वेळाखाली दबलेला आहे. काहीशा उग्र, आपल्या मुलांशीही तुसडेपणाने वागणारा.

Thursday, December 01, 2011 AT 01:00 AM (IST)

पणजी, ता. 29 : एखादा लॅपटॉप तुमच्या जीवनात सुखदुखाचे प्रसंग आणू शकेल. तुम्ही म्हणाल हे कसे शक्‍य आहे, तो थोडीच आपल्यासारखा सजीव आहे. खरं आहे तुमचं. पण लॅपटॉप जरी सजीव नसला, तरी सजीवांकडे असणारी एक गोष्ट मात्र त्याच्याकडे आहे, ती म्हणजे त्याची मेमरी. या मेमरीतील डाटा जर हाती लागला, तर कदाचित जीवनात काही बदल घडू शकतील, अशी मध्यवर्ती संकल्पना ठेवून गौतम कुंडु यांनी "लॅपटॉप' या बंगाली चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Wednesday, November 30, 2011 AT 01:30 AM (IST)

पणजी, ता. 29 - वेगळ्या धाटणीच्या भूमिकांच्या शोधात मी असतो. क्रिश 3, अग्निपथ, जन्मगाठ, कशाला उद्याची बात या नव्या सिनेमातून माझ्या भूमिकेतले वेगळे पैलू दिसतील, असे मनोगत आज मराठी अभिनेते सचिन खेडेकर यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. "ताऱ्यांचे बेट' या चित्रपटाचा इफ्फीतील इंडियन पॅनोरमात समावेश झाल्यामुळे या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते सध्या गोव्यात आहेत.

Wednesday, November 30, 2011 AT 01:45 AM (IST)

पणजी, ता. 29   ः सध्या देश, राज्य पातळीवर गाजणाऱ्या मल्लापेरियर धरणाचे पडसाद आज गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इप्फी) उमटले. मल्लापेरियर धरण लवकर पुन्हा बांधले जावे, या मागणीसाठी इफ्फीत आलेल्या केरळच्या सिनेसृष्टीतील प्रतिनिधींनी एकत्र येऊन निदर्शने केली.  इफ्फीत देशीविदेशी मीडिया येत असल्यामुळे मीडियाचे लक्ष वेधून घेण्यासाठी काळे बिल्ले लावून निषेध केला असल्याची माहिती केरळमधील एक अभिनेते रवींद्रन यांनी दिली.

Wednesday, November 30, 2011 AT 01:30 AM (IST)

 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: