Last Update:
 
विशेष लेख

झिरो टॉलरन्स टू करप्शनची घोषणा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सत्तास्थानी येतानाच करण्यास प्रारंभ केला होता. परिवर्तनातून लोकांनी निवडून दिलेले सरकार सत्तेत आल्यास पाच महिने पूर्ण झाले आहेत. अधूनमधून झिरो टॉलरन्स टू करप्शनची नारेबाजी करीत चालू आठवड्यात भारताच्या स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणानंतर भ्रष्टाचारातून मुक्तता देण्याचा पुनरुच्चार केला आहे.

Friday, August 17, 2012 AT 09:58 PM (IST)

तांत्रिकी शिक्षण क्षेत्रात गोव्यात गेल्या वर्ष दोन वर्षांत झपाट्याने होत आहेत. यंदा वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या 50 तर गेल्यावर्षीपासून यंदापर्यंत अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी 35 टक्के जागा वाढल्या. प्रयत्नातून, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या भूखंड देण्यासंबंधीच्या कठोर भूमिकेतून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीसारख्या संस्था (एनआयटी) फक्त गोमंतकीयांसाठी 50 टक्के जागा द्यायला तयार झाली.

Friday, June 29, 2012 AT 10:11 PM (IST)

म्हादई पाणी वाटप तंटा लवादाची कार्यवाही होण्यास चालढकल होत असून ही प्रक्रिया जलद गतीने व्हावी यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अर्जावर आता 23 जुलै रोजी सुनावणी होणार असल्याचे वाचनात आले आहे.  दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.

Tuesday, June 26, 2012 AT 02:15 AM (IST)

धो धो पावसात 18 जून क्रांतिदिनाचा आझाद मैदानावरील मुख्य कार्यक्रम आटोपल्यानंतर शहराचा एक फेरफटका मारताना गोव्याच्या राजधानीतील कानाकोपऱ्यात काय साचले आहे, काय दडले आहे, काय वाहून गेले आहे आणि काय बुडणार आहे याचा अंदाज आला. संध्याकाळपर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद पणजीत झाल्याची माहिती मिळाली त्यावेळी पावसाने पणजीवासीयांचा का पिच्छा पुरवला असावा याचे विचारचक्र सुरू झाले.

Saturday, June 23, 2012 AT 02:00 AM (IST)

धो धो पावसात 18 जून क्रांतिदिनाचा आझाद मैदानावरील मुख्य कार्यक्रम आटोपल्यानंतर शहराचा एक फेरफटका मारताना गोव्याच्या राजधानीतील कानाकोपऱ्यात काय साचले आहे, काय दडले आहे, काय वाहून गेले आहे आणि काय बुडणार आहे याचा अंदाज आला. संध्याकाळपर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद पणजीत झाल्याची माहिती मिळाली त्यावेळी पावसाने पणजीवासीयांचा का पिच्छा पुरवला असावा याचे विचारचक्र सुरू झाले.

Saturday, June 23, 2012 AT 02:00 AM (IST)

एखाद्या राज्य सरकारचे शंभर दिवस पूर्ण होणे तसे महत्त्वाचे नव्हे, किंबहुना शंभर दिवसांचा कालावधी कोणत्याही नव्या सरकारला सुधारणांसाठी अल्पच आहे. मात्र गोव्यात सध्या आठ वर्षांच्या कालावधीनंतर सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी दिलेल्या आश्‍वासनांची पूर्ती कशी होते यापेक्षा ती कधी होते याला महत्त्व आले आहे.

Saturday, June 16, 2012 AT 02:00 AM (IST)

1975 साली 7 भारतीय रुपये म्हणजे एक अमेरिकी डॉलर असे मूल्य होते! त्याच डॉलरला सध्या 55 रुपये 3 पैसे मोजावे लागतात!! ही नीचांकी घसरण चिंताजनक असल्यानेच रिझर्व्ह बॅंकेला, रुपयाचे अवमूल्यन रोखण्यासाठी हस्तक्षेप करायचा निर्णय घ्यावा लागला.

Thursday, June 14, 2012 AT 10:02 PM (IST)

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या विविध निर्णयांमुळे राज्यातील शिक्षणक्षेत्रासमोर अनेक प्रश्‍नांची मालिका उभी राहणार आहे. यामध्ये सर्वसामान्य माणूस कालांतराने शिक्षणापासून हद्दपार होतोय, की काय याचीच भीती वाटू लागली आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षणाप्रती कळवळा असणाऱ्या नागरिकांनी सरकारच्या या (अ)शैक्षणिक धोरणाकडे फक्त भाषामाध्यमाच्या प्रश्‍नाच्याच चष्म्यातून न पाहता, शिक्षणाच्या सर्वांगीण विकासाच्या नजरेतून पाहणेही अत्यंत आवश्‍यक बनले आहे.

Thursday, June 14, 2012 AT 02:00 AM (IST)

पंचायतीच्या निवडणुका नुकत्याच यशस्वीपणे पार पडल्या. 185 पंचायतींमधून 1481 पंच पंचायतींवर पोचले आहेत. पंचायती राजच्या यशस्वीतेच्या दृष्टीने ही बाब मोठी असली तरी पंचायतीवर कब्जा मिळवण्यासाठी जी जीवघेणी स्पर्धा चालू आहे ती बाब फार चिंताजनक आहे. याबाबत तोडगा काढण्याबाबत सरकारने विचार करणे आवश्‍यक आहे.    पंचायत निवडणूक ही पक्षविरहित असते.

Tuesday, June 12, 2012 AT 02:00 AM (IST)

सोलापूर शहरात कवित्रय राहत असे. या कवित्रयातील शेवटचा दुवाही शनिवारी निखळला. कविवर्य संजीव, रा. ना. पवार आणि दत्ता हलसगीकर या तीन कवींमुळे स्वातंत्र्योत्तर कवितेच्या प्रांतात सोलापूरचा नावलौकिक वाढला होता. कवी संजीव हे तापट स्वभावाचे होते. रा. ना. पवार हेही फारसे कुणात मिसळत नसत. आपल्याच कवितेच्या विश्‍वात ते रममाण होत असतं. दत्ता हलसगीकर हे मात्र जनमानसात मिसळणारे कवी होते. नवोदितांचे ते आधारस्तंभ होते.

Monday, June 11, 2012 AT 02:00 AM (IST)

भारताचा सुपर ग्रॅंडमास्टर विश्‍वनाथन आनंद बुद्धिबळात पाचव्यांदा जगज्जेता बनला, त्यामुळे भारतीय बुद्धिबळ जगतात आनंददायी वातावरण असताना, उझबेकिस्तानमधील ताश्‍कंद येथे गोव्याची इव्हाना फुर्तादो हिने आशियायी ज्युनिअर बुद्धिबळात मुलींच्या गटात विजेतेपदाला गवसणी घातली. पुन्हा एकदा ती बुद्धिबळातील चौसष्ट घरांची "क्‍वीन' ठरली. आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक जिंकणे हे काही इव्हानासाठी अप्रूप नाही.

Friday, June 08, 2012 AT 10:20 PM (IST)

गोवा विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तेत सरकार आल्यास आज तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आहे. सरकारसमोर असलेली आव्हाने, गोव्यातील बदलते जीवनमान, हवामान आणि त्या दृष्टिकोनातून सरकारची सुरू झालेली वाटचाल आशादायक आणि दिलासा देणारी असली तरी सर्व घटकांना समाधान देण्यासाठी, समतोल साधण्यासाठी करावी लागणारी कसरत पाहता भविष्यातही काही तडजोडी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

Friday, June 08, 2012 AT 10:18 PM (IST)

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू व्हायची वेळ आली आहे. नेमेची येतो मग पावसाळा या म्हणीप्रमाणे बारावी, सीईटी, स्पर्धात्मक परीक्षांचे एक एक निकाल घोषित होऊ लागले आहेत. राज्यातील व्यावसायिक महाविद्यालयातील अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढू लागल्यामुळे मुंबई, दिल्लीसारख्या भागात प्रसिद्ध असलेल्या पेस अकादमीसारख्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांसाठी तयार करणाऱ्या संस्था गोव्यात येऊ घातलेल्या आहेत.

Saturday, May 26, 2012 AT 02:00 AM (IST)

मनोहर पर्रीकर यांचे सरकार राज्यात अधिकारारूढ झाल्यापासून सर्वत्र परिवर्तनच दिसून येत आहे. प्रशासकीय पातळीवरही भरपूर बदल झाले. त्यातून क्रीडाक्षेत्रही सुटलेले नाही. काणकोणचे आमदार रमेश तवडकर यांची क्रीडामंत्री म्हणून निवड झाली. खरं म्हणजे, या मंत्रिपदासाठी नावेलीचे आमदार आवेर्तान फुर्तादो यांनी भरपूर मोर्चेबांधणी केली होती असे नंतर समजले. एक गोष्ट खरी गोमंतकीय क्रीडाक्षेत्र म्हणजे काही फुटबॉलच नव्हे.

Saturday, May 26, 2012 AT 01:45 AM (IST)

मोपा विमानतळाचा उच्चाधिकार समितीने तयार केलेला अहवाल सरकारने स्वीकारल्याची घोषणा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केली आणि डिसेंबर 2012 पर्यंत विमानतळ बांधणीच्या कामास प्रत्यक्ष सुरूवात होऊन तीन वर्षात हा आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवल्याचे सांगितले आणि गोवा म्हणजे फक्त "दक्षिण गोवा' उत्तरेशी ज्यांचा काहीही संबंध नाही, असा असंतुष्टांनी मोपाचे राजकारण करावयास पुनश्‍च सुरूवात केली आहे.

Thursday, May 03, 2012 AT 01:45 AM (IST)

भारतीय फुटबॉल मैदानावर गोमंतकीय फुटबॉलची विजयी पताका फडकावत ठेवताना धेंपो स्पोर्टस क्‍लबने एकंदरीत पाचव्यांदा राष्ट्रीय विजेतेपदाचा मान मिळविला. दोनवेळा राष्ट्रीय साखळी स्पर्धा जिंकलेल्या आर्मांद कुलासोंच्या मार्गदर्शनाखालील या संघाने तिसऱ्यांदा आय-लीग स्पर्धा जिंकली. व्यावसायिक धर्तीवर आय-लीग स्पर्धेचे हे पाचवे वर्ष. गोमंतकीयांच्या दृष्टीने आनंदाची बाब म्हणजे या स्पर्धेच्या पाचही वर्षांत गोमंतकीय संघच जिंकलेला आहे.

Tuesday, April 24, 2012 AT 03:00 AM (IST)

निसर्गसुंदरता आणि सोनेरी समुद्र किनाऱ्यांमुळे केवळ देशातीलच नव्हे तर विदेशातील नागरिकही गोव्याला भेट देण्यास आतुर असतात. गोव्याबद्दलची ही ओढ केवळ भेटीपुरती मर्यादित असेल तर ठीक, पण येथील सुंदर गोव्यात आपलंही घर असावं असं जर एखाद्या परराज्यातील अथवा परदेशातील पर्यटक किंवा व्यावसायिकाला वाटायला लागले तर मग सुरू होते, गोव्यातील जमीन विकत घेण्याची चढाओढ. नेमकी हीच बाब हेरून गोव्यातील जमिनी परकीयांच्या घशात घालण्यासाठी गोव्यातील दलाल टपून बसले आहेत.

Saturday, April 21, 2012 AT 01:45 AM (IST)

पाण्यावर हक्क कोणाचा हा प्रश्‍न येणाऱ्या काळात कळीचा ठरणार आहे. पाणी आजवर नैसर्गिक संपत्ती मानली जात आहे. ती राष्ट्रीय संपत्ती झाली आहे हे वास्तव पचनी पडणारे नाही. बिहारमध्ये मे 2000 मध्ये नदीयात्रा होती. बिहारमधून वाहणाऱ्या नद्या वाचविण्यासाठी लोकांनी काढलेली 8 दिवसांची पदयात्रा कव्हर करण्यासाठी "सकाळ'ने मला पाठविले होते. तोवर पाणी या विषयाशी मी तसा संबंधित नव्हतो.

Thursday, April 19, 2012 AT 03:15 AM (IST)

दक्षिण गोव्याला आता चोवीस तास पाणी पुरवठा करण्यात येईल, असे वृत्त वाचनात आले. हे व्यावहारिक पातळीवर कितपत शक्‍य आहे? त्यासाठी नवीन प्रकल्प सुरू करण्याचे सरकारने ठरविले आहे. "सुंदर माझा गोवा,' "निसर्गाने सजलेला गोवा,' 'सृष्टीने नटलेला गोवा' अशा कविकल्पनांतून व्यक्त झालेला किंवा "हिरवळ आणिक पाणी तेथे मजला सुचती गाणी' आणि "माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे कडे कपारीमधून घट फुटती दुधाचे' असे म्हणणाऱ्या बा. भ.

Thursday, April 19, 2012 AT 03:00 AM (IST)

देशाचे परराष्ट्र धोरण, राजनैतिक भूमिका यांच्याबाबत काही मोजके अपवाद वगळता आपल्याकडील साहित्यिक आणि कवी अलिप्त, उदासीन असतात. कवितेने एखाद्या राजकीय मुद्‌द्‌यावरील चर्चेने देश ढवळून निघावा, ही तर अविश्‍वसनीय अशीच गोष्ट वाटेल. मात्र जर्मनीत असे घडले आहे. गुंथर ग्रास या नोबेलप्राप्त साहित्यिकाने लिहिलेल्या एका कवितेने "राजकीय सावधगिरी'च्या (पोलिटिकल करेक्‍टनेस) जर्मनीच्या पवित्र्यालाच हादरा दिला आहे.

Wednesday, April 18, 2012 AT 03:45 AM (IST)

अखेर राज्य सरकारच्या कन्यादान योजनेचा गाशा गुंडाळला जातो आहे. कन्यादान नको कन्याधन असे या योजनेचे नामकरण करावे अशा सूचना वारंवार मागील दोन वर्षात या स्तंभातून केल्या. गोवा विधानसभेत आमदार पांडुरंग मडकईकर यांनी त्यासंदर्भात सरकारचे लक्ष वेधले होते. कन्यादानाच्या पुण्याची पुराणकालीन थोरवी आजही गायली जाते, त्या थोरवीला हळूहळू फाटा द्यायला हवा. लेकीला दान करण्याची संकल्पनाच डोक्‍याला झिणझिण्या आणणारी आहे.

Tuesday, April 17, 2012 AT 03:45 AM (IST)

पणजी, ता.15 (प्रतिनिधी): जानेवारी-फेब्रुवारीपर्यंतच मिळणारी गावठी कलिंगडे आता एप्रिल-मे महिन्यातही गोव्यात उपलब्ध होणार आहेत. केवळ हिवाळ्यातच कलिंगडाचे चांगले पीक येते या परंपरेला छेद देऊन सासष्टीतील पारोडा, पाझरखणी, धर्मापूर, कोलवा येथील शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात कलिंगडाची लागवड केली असून, येत्या काही दिवसांत या कलिंगडांचे पीक हाती येणार आहे.

Sunday, April 15, 2012 AT 09:04 PM (IST)

विकासकामाचे नवचैतन्याचे झरे पणजीत लवकरच वाहू लागतील, पण तत्पूर्वी जी विकासकामे केली जातील ती फक्त दीर्घकाळ टिकणारी नव्हेत तर जास्त काळ वापरता येतील, उपयोगी पडतील आणि त्यातून शहराचे चैतन्य, सौंदर्य कायम राहील याची दक्षता घ्यावी लागेल. गोव्याच्या राजधानी पणजीला पुन्हा एकदा सात वर्षांनी मुख्यमंत्री मिळाला आहे. पणजीचे आमदार मनोहर पर्रीकर यांना राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याआधीच पणजी चकाचकचे वेध त्यांना लागले होते.

Saturday, March 31, 2012 AT 03:00 AM (IST)

नियोजित लुसोफोनिया क्रीडा स्पर्धेत ऍथलेटिक्‍स, बास्केटबॉल, व्हॉलिबॉल, बुद्धिबळ, फुटबॉल, फुटसाल, ज्युडो, तायक्वांदो, बीच व्हॉलिबॉल व टेबल टेनिस या खेळांचे आयोजन होईल. फुटबॉलसाठी फातोर्ड्यातील नेहरू स्टेडियममुळे प्रश्‍न निकालात निघाला आहे. बुद्धिबळ स्पर्धा सिदाद-द-गोवा हॉटेलमध्ये होईल. त्यामुळे या क्रीडा प्रकाराचे सुरळीत आयोजन होईल. बीच व्हॉलिबॉल स्पर्धेसाठी मिरामार समुद्रकिनारा योग्य आहे.

Saturday, March 31, 2012 AT 02:30 AM (IST)

टीम अण्णाची संसदेचा अवमान करणारी भाषा बघितली, की ते स्वत:ला संसदेपेक्षाही मोठे समजत आहेत काय, याची शंका येते. याची जाणीव स्वत:ला गांधीवादी म्हणवून घेणाऱ्या अण्णांना कधी होणार? राघोबादादांच्या कट-शह-काटशहाच्या राजकारणामुळे पेशवाईला अवकळा आली आणि आता हे मराठी माणसाचं राज्य बुडीत खात्यात जमा होतं की काय, अशी शंका भल्याभल्यांच्या मनात येऊ लागली.

Thursday, March 29, 2012 AT 04:15 AM (IST)

 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: