Last Update:
 
ऊर्जा

फुले आणण्यासाठी मी परसबागेत गेले होते. पाहते तर बागेतल्या कुंड्यांतील रोपटी कोमेजलेली होती. गेल्या चार दिवसांपासून नळाचे पाणी मर्यादित असल्यामुळे मी त्या रोपट्यांना पाणी घालण्याचे विसरूनच गेले होते. मी घरात येऊन साठवून ठेवलेल्या पाण्यामधून बादलीभर पाणी बाहेर नेले व त्या रोपट्यांना घातले.  माझ्या मनात विचार आला, की सकाळी उठल्यापासून रात्री झोपण्यापर्यंत आपण पाण्यावर अवलंबून असतो.

Wednesday, March 20, 2013 AT 10:05 PM (IST)

"कृपया इथे कचरा टाकू नये', असे फलक आपण वाचलेच असतील. जिथे जास्त प्रमाणात कचरा आढळतो तशाच जाग्यावर असे मोठाले फलक उभारलेले असतात. मुळात हे फलक जागा स्वच्छ ठेवण्यासाठी लावले जातात, पण आपल्याला एक वाईट सवय असते. कचराकुंडी असली तरीही आपण कचरा जमिनीवर फेकतो किंवा ती कचराकुंडी भरून वाहेपर्यंत त्याच्यात कचरा ठोसतो.  आपले ना असेच आहे, जी गोष्ट करू नये अशी ठळक बजावणी करून सांगितलेली असते, नेमकी तीच गोष्ट आपण करतो.

Wednesday, March 20, 2013 AT 10:04 PM (IST)

गोवा मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थी मंडळाचा दोनदिवसीय आंतरमहाविद्यालयीन विद्यार्थी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये सुमारे दहा महाविद्यालयांनी सहभाग दर्शविला. यंदाच्या "जिनेसिस 2013'चे विजेतेपद धेंपो वाणिज्य महाविद्यालयाला प्राप्त झाले.  या महोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये साहित्यिक, संगीत, नृत्य, अभिनय व फॅशन असे विभाग होते.

Tuesday, March 19, 2013 AT 10:54 PM (IST)

एकेदिवशी तीन सुंदर स्त्रिया एकत्र आल्या. त्या आपल्या हाताच्या सौंदर्याविषयी चर्चा करत होत्या. त्यांच्यातील एक आपले हात वारंवार धूत असे. दुसरीच्या हातात गुलाबाचे फूल होते, तर तिसरीचे हात मोगऱ्याच्या सुगंधाने सुवासिक होते. तिघींपैकी सुंदर हात कोणाचा याबद्दल त्यांना निर्णय हवा होता. इतक्‍यात तिकडून एक भिकारीण आली. तिघींनी तिला विचारले, "आमच्यापैकी कोणाचा हात सगळ्यात सुंदर आहे?' ती म्हणाली, "मी फार भुकलेली आहे. प्रथम मला खायला घ्या.

Tuesday, March 19, 2013 AT 10:53 PM (IST)

एकेदिवशी तीन सुंदर स्त्रिया एकत्र आल्या. त्या आपल्या हाताच्या सौंदर्याविषयी चर्चा करत होत्या. त्यांच्यातील एक आपले हात वारंवार धूत असे. दुसरीच्या हातात गुलाबाचे फूल होते, तर तिसरीचे हात मोगऱ्याच्या सुगंधाने सुवासिक होते. तिघींपैकी सुंदर हात कोणाचा याबद्दल त्यांना निर्णय हवा होता. इतक्‍यात तिकडून एक भिकारीण आली. तिघींनी तिला विचारले, "आमच्यापैकी कोणाचा हात सगळ्यात सुंदर आहे?' ती म्हणाली, "मी फार भुकलेली आहे. प्रथम मला खायला घ्या.

Tuesday, March 19, 2013 AT 10:52 PM (IST)

चाफा म्हटला, की आपल्याला आठवते ते चाफ्यावरच जुनं व गाणं... ""चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या खुलेना...'' या गाण्यामुळे उभे राहते ते निष्पर्ण हजारो फुलांनी भरलेले चाफ्याचे झाड! फाल्गुन जसजसा जवळ यायला लागेल, तसे त्याला फुलण्याचा जणू वेडच लागते. कितीतरी दिवसापर्यंत घट्ट मिटून राहिलेल्या कळ्या फुलायला लागतात.

Monday, March 18, 2013 AT 10:44 PM (IST)

तो एक "नो एंट्री' रस्ता होता. माझ्यापुढे एक बस चालली होती. पुढे वळण होते. अचानक एक बाई उलट्या बाजूने स्कूटरवरून समोर आली. पुढे एक लहान मुलगा उभा, मागे एक लहानगी बसलेली! शाळेला बहुतेक उशीर झाला असावा, त्यामुळे वळसा घालून जाण्याऐवजी "शॉर्टकट'ने गेलेले बरे असा विचार तिने केला असावा. वळणावर अनपेक्षितरितीने स्कूटर पुढ्यात आल्यावर बसचालक हबकला. त्याने जीव खाऊन ब्रेक लावले. बाई लटपटली, नशीब... पडली नाही. बसच्या मागे मीही करकचून ब्रेक लावले.

Monday, March 18, 2013 AT 10:43 PM (IST)

नाटक म्हटले, की माझ्या मनात एक उत्सुकता निर्माण होते. कुठेही शेजारच्या गावामध्ये नाटक असले, की आम्ही मित्र ते पाहायला आवर्जून जातो, कारण त्या नाटकातून आम्हाला खूप काय शिकता येते. प्रत्येक नाटकात काम करणाऱ्या कलाकारांची कला, त्यांचे विचार आम्ही आत्मसात करू शकतो. याचा अनुभव मला माझ्या नाटकात काम करताना मिळाला.  पहिल्यांदा मी फक्त नाटक पाहण्याचे काम करत होतो. आमच्या गावात हौशी कलाकारांची नाटके होतात.

Sunday, March 17, 2013 AT 10:35 PM (IST)

माणसाचे जीवन हे संघर्षमय असते. या जीवनात संसाराचा गाडा हाकताना आपल्यावर अनेक संकटे येतात. माणूस सुखात खूष असतो, पण जेव्हा त्याच्यावर कोणतेही संकट आले, की तो भयभीत होऊन खचून जातो आणि त्याला काहीही सुचेनासे होते. जेव्हा माणसावर संकटे येतात व काही सुचेनासे होते, तेव्हा तो आत्महत्या किंवा आपल्या जिवाचे बरेवाईट करतो. माझ्या मते ही कृती चुकीची आहे. जेव्हा अशी संकटे येतात, तेव्हा त्यावर माणसाने मात केली पाहिजे.

Sunday, March 17, 2013 AT 10:34 PM (IST)

पौषातली थंडी या दिवसात अधिकच जाणवू लागली आहे. सभोवताली असणारी झाडेझुडपे, प्राणी सकाळी थंडीने गारठून जातात. या थंडीच्या सोबतीला नजर जाईल तिकडे धुंद धुके पडलेले दिसते. डोळे सुखावणारे हे दृश्‍य या दिवसात अनेकदा अनुभवायला मिळते. पौषात येणारी संक्रांत तर सगळ्यांना शत्रुत्व विसरून स्नेह वाढवा असे सांगते आणि म्हणूनच आपण काही दिवसांपूर्वी एकमेकांना तिळगूळ वाटले.  सकाळचे लालभडक सूर्यबिंब हळूच डोकावते, उगवते व धुक्‍यातून आरपार जात असते.

Wednesday, January 23, 2013 AT 10:30 PM (IST)

आजच्या स्पर्धात्मक जगात आपणाला सतत सतावणारा प्रश्‍न म्हणजे आपण मागे तर राहिलो नाही ना? आपला प्रतिस्पर्धी आपल्या पुढे तर गेला नाही ना? ही फक्त पुढे जाण्याची धावपळ नसते, तर दुसऱ्याला मागे टाकून पुढे जाण्याची धडपड असते. परीक्षेत आपणाला कमी गुण मिळाले आणि आपल्या जवळच्या मित्राला जास्त गुण मिळाले, तर आपण दुःखी होतो. लहानपणापासूनच आपण स्वतःची दुसऱ्यांबरोबर तुलना करत आलो आहोत.  स्पर्धा म्हटली, की हार-जीत येतेच.

Wednesday, January 23, 2013 AT 10:30 PM (IST)

आत्मीयता हे जीवनरूपी वृक्षाचे मूळ आहे. प्रेम हे त्याचे शिखर. आत्मीयता हे साधन तर प्रेम हे साध्य. प्रेमाची वाट आत्मीयतेच्या रसायनातून सुरू होते. आत्मीयता म्हणजे आपलेपणा. आपलेपणा असल्याशिवाय माणसाला दुसऱ्याविषयी सहानुभूतीच वाटत नाही. त्याच्याशी माझा काय संबंध? तो आपला कोण? हे प्रश्‍न आपलेपणाची भावना तोडून टाकतात. आम्ही सगळे एकाच भूमीतले सजीव. पायाखाली जमीन आणि डोक्‍यावर आभाळ हाच सर्वांच्या माणुसकीला जोडणारा धागा. आत्मीयता माणसातला संबंध जागवते.

Wednesday, December 12, 2012 AT 10:05 PM (IST)

अहंकार ही एक मानसिक वृत्ती असते. अहंकारी मन हे नेहमी भूतकाळात असते. आपल्याशी कोण कसा वागेल, कुणी काय म्हटलं, त्याला कसे प्रत्युत्तर द्यायचे हेच अहंकारी मनात चालत असते. अहंकारामुळे जे समाधान मिळते ते क्षणभंगुर असते. अहंकारी मनात नेहमी माझ्यापेक्षा जास्त किंवा माझ्यापेक्षा कमी हेच चालत असते. एखाद्याने आपल्यापेक्षा जास्त किमतीची वस्तू खरेदी केली, की अनेकजण स्वतःचा अहंकार स्वतःच दुखवून घेतात.

Wednesday, December 12, 2012 AT 10:04 PM (IST)

वारात वार रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस. घरातील साफसफाई करता करता कोपऱ्यात उभ्या असलेल्या कपाटाकडे सहज लक्ष गेलं. पुस्तकांनी भरलेलं कपाट होतं ते, जणू काय ग्रंथालयच! थोडा वेळ विचार केला, म्हटलं घरातील सर्व कामं आटोपलीच आहेत. आता लक्ष गेलं असतानाच वेळात वेळ घेऊन थोडी पुस्तकांची पण साफसफाई करावी आणि केली एकदाची सुरवात. पुस्तके निटनिटकेपणाने त्या-त्या जागेवर ठेवत असतानाच अचानक एक पुस्तक हातात आलं. वाचण्यासाठी पुस्तक उघडलं.

Monday, October 15, 2012 AT 10:12 PM (IST)

आयुष्याच्या धावपळीत माणूस एकटा पडून जातो. मागे पाहिल्यावर लक्षात येते, की सगळ्यांची साथ सुटली. पण त्याक्षणी मागे वळायचे नाही तर पुढेच जायचे ध्येय असते. जी माणसे चालता चालता हात सोडून जातात. ती माणसे आपली नसतातच मुळी. मग अशा माणसांची साथ हवीच कशाला? जी आपली आहेत, ती आपल्याबरोबर नक्कीच उभी राहणार. मग उगाच मनाशी का बाळगायचे, की मी आज एकटा पडलो आहे.  चांगल्या कार्यासाठी कधी कोण साथ देणार नाही. मागे खेचायला तर कित्येकजण तयार असतात.

Monday, October 15, 2012 AT 10:11 PM (IST)

वि. स. खांडेकरांचे "ते दिवस ती माणसे' हे आत्मचरित्रात्मक पुस्तक वाचत होते. त्यात त्यांनी म्हटलंय, की माणसाने माणसाला माणूस म्हणून ओळखणे यापेक्षा अधिक श्रेष्ठ आणि पवित्र अशी दुसरी कुठलीही गोष्ट या जगात नाही. खरं आहे ना मित्रांनो! सर्वांत मोठा धर्म माणुसकी. पृथ्वीवर पहिल्यांदा माणूस जन्माला आला आणि त्यानंतर माणुसकी... त्यामागे अनेक नाती जन्माला आली ती गोष्ट वेगळी. पण पहिलं माणसाशी असलेलं नातं ते म्हणजे माणुसकी.

Tuesday, October 02, 2012 AT 09:43 PM (IST)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक के. सुदर्शन आमच्या घरी आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक के. सुदर्शन यांचे निधन झाल्याची बातमी नुकतीच वाचली आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. गेल्या वर्षीचीच गोष्ट. संध्याकाळची वेळ. ही महान व्यक्ती फक्त अर्धा ते पाऊण तासासाठीच आमच्या घरी होती. पण तेवढ्या कमी वेळातसुद्धा बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी आम्हाला शिकवल्या. गोष्टी फार छोट्या छोट्या होत्या.

Tuesday, October 02, 2012 AT 09:37 PM (IST)

देशातील नागरिकांसाठी दरवर्षी वेगवेगळ्या योजना आखल्या जातात. पण प्रत्यक्षात या सर्व योजना जनतेपर्यंत पोचत नाहीत. या सर्व योजना गरिबांसाठी आखल्या जातात. पण त्या योजनांचा फायदा गोरगरिबांना न होता श्रीमंत लोकांनाच होतो. यामुळे गरीब माणसे बिचारी उपाशी मरतात. देशभरात गरिबांसाठी असलेले धान्य गरिबांना केव्हाच वेळेवर अथवा पुरेसे मिळत नाही, अशी सर्वच लोकांची बोंबाबोंब आपल्याला ऐकू येते. गावात जेथे जातो तेथे ऐकायला येते, की धान्य कमी प्रमाणात दिले जाते.

Tuesday, September 25, 2012 AT 10:04 PM (IST)

आपण खूप वेळा लोकांकडून ऐकले असेल किंवा वाचले असेल, की मी दान केलंय. दान खूप प्रकारचे असते, पण कोणतेही दान असो ते दान करायची संधी आपल्याला मिळायला हवी. काही लोकांना छोट्या दानाची खूप गरज असते. ते त्यांच्यासाठी छोटे नसते, पण आपणास ते छोटेसे वाटते. आपण जेव्हा प्रत्यक्षात दान करतो तेव्हा आपणास खूप आनंद होतो.  आपण खूप वेळा पाहतो, की लोक जेवण, कपडे दान करतात. अनेक गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पेन, रेनकोट, गणवेश यांचे दान केले जाते.

Tuesday, September 25, 2012 AT 10:03 PM (IST)

माझ्या मनाजवळ असणाऱ्या काही कवितांपैकी कुसुमाग्रजांची एक "कणा' ही कविता! अगदी सहज सोप्या शब्दांत एक मोठी शिकवण देऊन जाणारी एक कविता. शेवटच्या चार ओळी तर अप्रतिमच! पूरग्रस्त युवक जेव्हा आपली व्यथा सांगतो तेव्हा त्याच्या मदतीसाठी सरांचा हात खिशाकडे जातो, तेव्हा तो युवक आपल्या सरांना म्हणतो, "पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवर हात ठेवून नुसतं "लढ' म्हणा.

Wednesday, September 12, 2012 AT 09:57 PM (IST)

11 वी कला शाखेच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राध्यापकांनी मन या विषयावर 10 ओळी लिहून आणायला सांगितले होते. पण एकूण 50 विद्यार्थ्यांपैकी एकाच विद्यार्थ्याने कुणाच्या तरी मदतीने मनाविषयी लिहिले व वाहवा मिळवली. या गोष्टीवरून विद्यार्थ्यांचे वाचन, मनन, चिंतन कसे व किती होत असेल याची कल्पनाच केलेली बरी. बहिणाबाईंनी मनाला ढोर म्हटलेले आहे. त्या म्हणतात, "मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येत पिकावर.

Sunday, September 09, 2012 AT 09:52 PM (IST)

संपूर्ण गोव्याची जीवनदायिनी आणि गोव्यातील सगळ्यात मोठी नदी म्हणजे म्हादई. जास्तीत जास्त गोमंतकीयांची तृषा भागवण्याचं काम ही नदी करत आहे. तिला वेगवेगळ्या रूपात आमच्या पूर्वजांनी पाहिलेलं आहे. म्हणून तिला त्यांनी वेगवेगळ्या नावांच्या उपमादेखील दिलेल्या आहेत. काही ठिकाणी म्हादईला "म्हादय, मांडवी, म्हादई (महान आई)' इत्यादी नावांनी संबोधले जाते. म्हादईचा उगम पश्‍चिम घाटातील देगाव (कर्नाटक) या गावी झालेला आहे. अनेक उपनद्या म्हादईला मिळालेल्या आहेत.

Thursday, September 06, 2012 AT 10:07 PM (IST)

अंगातून श्रमांचा घाम गाळल्यावरच माणूस पवित्र होतो असे म्हणतात. श्रम दोन प्रकारचे असतात. शारीरिक आणि मानसिक. आमचे शरीर वापरून जे श्रम आपण येतो त्याला शारीरिक आणि मनाच्या चिंतनातून जे श्रम घेतो त्याला मानसिक अशी नावे आपण देतो. कोणतेही काम पार पाडण्यासाठी व कार्यभाग साधण्यासाठी आपल्याला श्रम घ्यावेच लागतात. प्रामाणिकपणे घेतलेल्या श्रमांचे फळ नेहमीच गोड असते. अथक परिश्रम न घेता शॉर्टकटने जे फळ मिळते, ते फसवे व तात्पुरत्या स्वरूपाचे असते.

Thursday, September 06, 2012 AT 10:03 PM (IST)

सध्या झी मराठीवर चालू असलेल्या "उंच माझा झोका' या मालिकेने बरीच झेप घेतली आहे. तेजस्वी वालावलकर या चिमुरड्या मुलीच्या अभिनयाने तर सर्व लोकांची मने जिंकून घेतलेली आहे. "उंच माझा झोका' ही मालिका बघितल्यावर आपला देश स्वतंत्र होण्यापूर्वीचे जीवन आपल्यासमोर उभे राहते. पण मनोरंजनाचा भाग बाजूला ठेवला तर या मालिकेतून खूप काही शिकण्यासारखे आहे. स्वातंत्र्यापूर्वीच्या जीवनाची पद्धत, विचारसरणी, रुढीपरंपरा, शिक्षण पद्धत या गोष्टींचा आपल्याला प्रत्यय येतो.

Friday, August 31, 2012 AT 10:36 PM (IST)

नव्या युगातील फॅशनेबल आणि स्टॅंडर्ड युवा युवतींना सलाम. आयुष्याच्या प्रवासातील सुखाच्या पायऱ्या चढत आपली स्वप्ने फक्त एखाद्या दोन किंवा चारचाकी गाडीपर्यंतच पोचतात. इथून पुढे आपल्याला स्वप्नांची वाट संपते. आयुष्यात सारे काही मिळालेच असा आभास होतो आणि मग आपण रिटायर्ड होतो, स्वत:च्या मनातल्या मनात.

Thursday, August 23, 2012 AT 10:38 PM (IST)

 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: