Last Update:
 
शब्दसोहळा

अंडरट्रायल, आयडी, गंगूबाई, भंवर, उडान, कूर्मावतार... ही आहेत, काही नावाजलेल्या चित्रपटांची नावं! पण तुम्ही म्हणाल, आम्ही तर कधीच ऐकले नाही, की या नावाचे चित्रपटही येऊन गेले. कदाचित भंगार असल्यामुळे डब्यात गेले असतील, त्यामुळे आपल्याला माहीत नाही, असा समज काही वाचक करून घेतील. शिवाय आठवड्याला किती पिक्‍चर येतात अन्‌ जातात...

Sunday, March 31, 2013 AT 04:53 PM (IST)

महर्षी सान्दीपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान (उज्जै न) व श्री पद्मनाभ शिष्य संप्रदायातर्फे श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठ, कुंडई येथे 17 ते 20 मार्च या काळात क्षेत्रीय वेद संमेलन सर्वदृष्टीने यशस्वीरीत्या पार पडले. चार दिवस ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेदीय पंडितांचे वेदपठण, वेदविश्‍लेष ण, वेद स्वाध्याय, ज्ञानसत्र, प्रबोधनसत्र अशा कार्यक्रमातून वेदविद्वांनानी विचार मंथन केले. ज्ञानामृताचा श्रोत्यांना आस्वाद दिला.

Saturday, March 30, 2013 AT 05:32 PM (IST)

अनुभवी व्यवस्थापनाची उणीव, विस्तार व गुंतवणूक करताना दूरदृष्टीचा अभाव, प्रचंड कर्जे यामुळे "किंगफिशर'चे विमान भरकटले. परदेशातून गुंतवणूक किंवा अन्य व्यवसायातील हिस्सा कमी करणे, हे दोनच पर्याय विजय मल्ल्या यांच्याकडे आहेत. परदेशातील अनेक विमानकंपन्या भारतातील विमान वाहतूक क्षेत्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. "किंगफिशर'च्या निमित्ताने परकीय विमान कंपन्यांना गुंतवणूक करण्यास केंद्र सरकार लवकरच मान्यता देण्याची शक्‍यता आहे.

Sunday, April 15, 2012 AT 05:16 PM (IST)

उत्तम कांबळे (uttam.kamble@esakal.com) मी पुस्तकांचा गठ्ठा बाजूला ठेवणार, तोच टीव्हीचा एक माणूस आला. "एक बाइट द्या', म्हणाला. हातात पुस्तकाचा गठ्ठा घेऊन बाइट देणं बरोबर नाही म्हणून तो ठेवण्यासाठी जागा शोधू लागलो. तेवढ्यात दुसरा एक जण पुढं आला. "सर, द्या माझ्याकडं,' असं नम्रपणे म्हणाला. मी चटकन त्याच्या हातात गठ्ठा दिला आणि बाइट देण्यासाठी बाजूला वळलो. माझ्या हातातला गठ्ठा घेणाऱ्याला मनातल्या मनात धन्यवाद देत होतो.

Sunday, April 15, 2012 AT 05:14 PM (IST)

उत्तम कांबळे uttam.kamble@esakal.com लिहिण्याची कल्पना छान आहेच पण आपण इथं जमलेल्या सर्वांनी महिन्याला पन्नास-शंभर रुपये वर्गणी काढून या मुलीचं शिक्षण पूर्ण केलं तर? सर्वांत जास्त आनंद आपल्याला होईल... आपण एक आयुष्य उभं केलं, ज्योत नव्हे तर फ्लड लाइटच लावला, असं समाधान आपल्याला मिळेल. गावानंच आपल्या गावातील पोरगी घडवली, हेही मोठ्या अभिमानानं सांगता येईल... बघा, विचार करा... तो तुम्हाला पटला तर मी माझ्या शंभर रुपयांपासून सुरवात करेन.

Sunday, February 05, 2012 AT 04:30 PM (IST)

सुप्रिया वकील supriyawakil@gmail.com 'रब से जियादा तेरा नाम लेता हूँ...रब मुझे माफ करे'...असं म्हणणाऱ्या सोहनी आणि महिवालची प्रेमकथा मनाला चटका लावून जाणारी. या दोघांचेही मृतदेह पाकिस्तानातील हैदराबादजवळील शाहदादपूरजवळ नदीत सापडले, अशी आख्यायिका आहे. याच ठिकाणी सोहनीची समाधी आहे. "प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे देणे ' अशा एका गीताच्या ओळी आहेत. असं हे देवाघरचे देणे' असणारे प्रेम काहींच्या जीवनाचा अर्थ, त्याचा मार्गच बदलून टाकतं.

Sunday, February 05, 2012 AT 04:32 PM (IST)

भारत सासणे author@esakal.com माझ्या पीएने मला ज्या इमारतीत नेलं होतं त्या इमारतीचं नाव विश्रामगृह असं होतं. मला उगाचच लाक्षागृह आठवलं. या इमारतीत विश्राम करण्यासाठी मात्र कोणी येत नसणार. तिथल्या वातावरणात आढळणारे सूक्ष्म भावनांचे तरंग मी वाचू लागलो.

Sunday, February 05, 2012 AT 04:36 PM (IST)

अणुऊर्जेची वाढ ही पुढच्या शंभर वर्षांत कशी होईल, हे अनेक गोष्टींवर अवलंबून असेल. ऊर्जेची मागणी ही फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोळसा, तेल व गॅस यांचे साठे फार कमी राहतील व त्यांच्या किमती भरमसाट वाढलेल्या असतील. अणुऊर्जा ही सर्वांत जास्त सुरक्षित ऊर्जा आहे. पण, लोकांचा असा गैरसमज होतो, की अणुऊर्जा धोक्‍याची आहे. डॉ. होमी भाभा व पंडित नेहरू यांच्या दृरदृष्टीतून 1948 मध्ये अणुऊर्जा आयोगाची स्थापना झाली. त्याचे अध्यक्ष डॉ. भाभा होते.

Sunday, February 05, 2012 AT 04:38 PM (IST)

डॉ. बाबा आढाव जगातील सर्वात मोठी व प्रगल्भ लोकशाही भारतात आहे. येत्या गुरुवारी भारतीय प्रजासत्ताकाला 62 वर्षे पूर्ण होत आहेत. अशा वेळी काही प्रश्‍नही निर्माण होतात. घटनेतील सर्व तरतुदी समाजातील खालच्या स्तरापर्यंत पोचल्या आहेत का? आदर्श राज्यघटना व तिचे समाजातील प्रतिबिंब यात सुसंगती आहे का? विसंगती असेल तर ती का आहे? भारतीय जनता खरोखर कितपत सार्वभौम आहे? "इंडिया'चे नामकरण 1950 मध्ये अधिकृतरीत्या "भारत' झाले.

Sunday, January 22, 2012 AT 02:00 AM (IST)

सुशील लाड भारतीय संगीत सृष्टीत आपल्या कर्तबगारीने विशेष ठसा उमटविलेले ऍन्थनी गोन्साल्वीस यांनी खरंतर संगीत सृष्टीला एक नवा आयाम दिला. त्यांनी आपल्या हयातीत केलेले अप्रतिम संगीत आजही संगीत रसिकांना भुरळ घालत आहे.

Sunday, January 22, 2012 AT 01:30 AM (IST)

- उत्तम कांबळे वसाहत आता चांगली झाली असंल, तर मग चांगलं नाव का असू नये, असा प्रश्‍न बायांना सातत्यानं पडू लागला. त्यातून झालं नामांतर... पन्नास वर्षांच्या वसाहतीला मिळालं "शिवाजीनगर' असं नाव. एक मोठं परिवर्तन झालं होतं. बायांच्या लढाईचं ते फलित होतं. याशिवाय कोणत्या तरी एका महाराजांनीही प्रयत्न केला होता. वसाहतीला असलेलं निंदाजनक नाव गळून पडलं आणि एका युगपुरुषाचं नाव लाभलं...

Sunday, January 22, 2012 AT 01:00 AM (IST)

- भारत सासणे प्रवासाची सुरवात तर झाली. महाभारत युद्धानंतर हा देश आता कसा आहे, व या देशातील माणसं कशी जगत आहेत हे बघण्यासाठी आता बाहेर पडायचं आहे. आणि सोबत आहे आपला स्वीय सहायक बलराम. पण तत्पूर्वी पोशाख इत्यादीबाबत स्वतःला ठाकठीक करावं लागेल. माझा स्वीय सहायक त्या चारचाकी रथाकडे म्हणजेच ट्रककडे चालायला लागला. ट्रकचा चालक खिडकीतून डोकं बाहेर काढून अजूनही आमच्याकडे पाहत होता. त्याच्या डोक्‍यातून बाहेर पडणारे तरंग मी माझ्या पद्धतीने वाचत राहिलो.

Sunday, January 22, 2012 AT 12:45 AM (IST)

- हिरा दामले गरीब - श्रीमंत असा भेदभाव नाही. मात्र परिस्थितीची जाण असणे गरजेचे असते. एखादी पंचाहत्तरी ओलांडलेली व्यक्‍ती त्यांनी आपली पुढची बोनस आयुष्याची वाटचाल युक्‍तीने करायला हवी. अपवाद वगळता सत्ता - मत्ता दोनही मर्यादित असतात. ताकद कमी झालेली असते. व्याधी नावाचे मित्र कमी अधिक प्रमाणात असतातच. ते शेवटच्या श्‍वासापर्यंत आपल्याला सोबत करतात. अशावेळी आवराआवर सतत करावी. आपली कामे आपणच करावी.

Sunday, January 22, 2012 AT 12:30 AM (IST)

- सुमेधा प्रमोद जोशी, गवाणे, खोतोडे - वाळपई माझ्या मते पूर्ण पुरुष किंवा सर्वगुण संपन्न अशी व्यक्ती भूतलावर सापडणार नाही. म्हणूनच संसार टिकवायचा असेल तर नवरा बायकोनं एक शब्द आपल्या डोक्‍ यात पक्का करून ठेवला पाहिजे तो शब्द म्हणजेच "तडजोड'. दोघांनीही संपूर्ण गुण व दोषांसह आपल्या जोडीदाराला स्वीकारायची मनाची तयारी ठेवली पाहिजे. ""तुम्ही आज परत पत्ते खेळायला जाऊ नका सांगून ठेवते. रात्रीचे 10.30 वाजलेत.

Sunday, January 22, 2012 AT 12:15 AM (IST)

पर्णहीन वृक्ष - बोचरी थंडी सारंच असह्य होणारं. घरातले खिडक्‍यांचे जाड पडदे पूर्ण बंद करून त्या सर्वांशी नातंच तोडलं. याच वेळी घरात मात्र वसंत फुलत होता. औत्सुक्‍याने भारलेलं नवागताच्या आगमनाचे दिवस जवळ येऊ लागले. ठरल्यावेळी आसमंत उजळून टाकणारा "तारा' जन्माला आला. आनंद - उत्साहाने घरात जणू वसंत फुलला. संपूर्ण घराचं नंदनवनच झालं. - वृंदा कंटक ऋतू बदलणे म्हणजे काय होत? या प्रश्‍नाचं उत्तर मला या वेळी अचूक सापडलं.

Sunday, January 22, 2012 AT 12:00 AM (IST)

- किशोर पेटकर, 9881099261 फलंदाजांचे नंदनवन मानले जाणाऱ्या सिडनी क्रिकेट मैदानावर भारताचा डाव आणि 68 धावांनी पराभव झाला, महेंद्रसिंह धोनीच्या संघाने एकदम कमजोर प्रदर्शन केल्यामुळे ऑस्ट्रेलियाने मालिकेत 2-0 अशी न गमावणारी आघाडी घेतली. मेलबर्नपाठोपाठ सिडनीला भारतीय फलंदाजीची वाताहत झाली.

Saturday, January 07, 2012 AT 11:00 PM (IST)

- प्रशांत शेटये आता वेळ आहे बदलाची. स्त्रीत्वावर आधारित बदलाचे सूत्र घेऊन स्त्रियांच्या जाणिवा व्यक्त करायची. त्यासाठी माध्यमाची (फॉर्म) मोकळीक विद्यार्थिनींना देण्यात आली. ही संकल्पना स्पर्धकांसाठी पूर्णपणे नवीन होती. पण, विद्यार्थिंनी व त्यांच्या पथकातील सहकाऱ्यांनी हे आव्हान पेलून ही स्पर्धा यशस्वी केली. स्पर्धक महाविद्यालयांनी या संकल्पनेशी पटकन जुळवून घेत सर्जनशीलतेचे प्रदर्शन घडवले.

Saturday, January 07, 2012 AT 11:15 AM (IST)

आपल्या वेगळ्या कथांनी वाचकांच्या मनात स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे साप्ताहिक सदरात उलगडत आहेत यंत्रमानवाचा प्रवास... भारत सासणे ती रात्र मला अजूनही आठवते. पाच हजार वर्षे होऊन गेली असतील. मध्यरात्रीची मसलत संपवून अश्‍वत्थामा रात्री संहारासाठी बाहेर पडला तेव्हा मी पांडवांच्या शिबिराबाहेर तैनात होतो. युद्ध समाप्त झाले होते आणि सगळे वीर दमून झोपले होते, पाडंव पुत्रसुद्धा.

Saturday, January 07, 2012 AT 10:47 PM (IST)

प्रस्ताव दाख ल करू इच्छिणाऱ्या सभासदाने तशी सूचना सचिवाकडे द्यावी लागेल. या सूचनेसोबत प्रस्तावाद्वारे उपस्थित करू इच्छिणाऱ्या विषयांविषयी मुद्‌द्‌यांची यादी व त्याविषयाचे थोडक्‍यात स्पष्टीकरण करणारे निवेदन असले पाहिजे.. सार्वजनिक हिताच्या प्रश्‍नावर सभागृहात चर्चा घडवून आणायचे असेल किंवा सभागृहात त्यासंबंधी प्रश्‍न उपस्थित करायचा असेल तर "प्रस्तावा'द्वारे तो उपस्थित करणे हा एक मार्ग आहे.

Saturday, January 07, 2012 AT 11:45 AM (IST)

होर्डिंग लावणारे हात आणि पुरस्कार वाटणारी मंडळी खूप तयारीची असतात. ते कोणाला कोणताही पुरस्कार देतात. कुणाला धर्मरक्षक, कुणाला राष्ट्ररक्षक, कुणाला समाजरक्षक, तर कुणाला आणखी काही. महर्षी, कर्मवीर असेही पुरस्कार ते देऊ शकतात. पूर्वी शिक्षणमहर्षी भाऊराव यांनाच हा पुरस्कार दिला होता. आता गल्लीबोळांत कर्मवीर तयार झाले आहेत. ते कोणते कर्म करतात, हे कोणी विचारू नये कारण हकनाक दुःख वाढतं...

Saturday, January 07, 2012 AT 01:30 AM (IST)

गोवा विधानसभा निवडणुकीतील शह काटशहाचे राजकारण पुढील दोन आठवड्यात कसे वळण घेईल त्यानुसार मतदार, मतदानाचे आडाखे बांधले जातील, तूर्तास आचारसंहितेला टांग मारून मतदारांना आकर्षित करण्याची स्पर्धा चालू झाली आहे. या स्पर्धेत कोणाला डोक्‍यावर घ्यावे, कोणाला घरी पाठवावे तो निर्णय सुज्ञ मतदारांचाच असेल हे विसरून चालणार नाही...

Saturday, January 07, 2012 AT 12:00 PM (IST)

नेमाडेंची "कोसला' सगळ्यांना माहीत असते पण त्यांची "झूल' त्याहूनही वेधक आहे. तिच्यात चांगदेव आणि राजेश्‍वरी यांचा संवाद आला आहे. नल-दमयंती कथेवर राजेश्‍वरीनं नाटक लिहावं असं चांगदेवला वाटतं. राजेश्‍वरीने तसं नाटक लिहिलं की नाही न जाणे, नल जाणे. आपल्यापैकी कुणीतरी मात्र आता नव्या दृष्टीने ही प्रेमकहाणी लिहिलीच पाहिजे. - द. भि कुलकर्णी आपल्याला असं वाटतं, की प्रेम करण्यात आपणच वाकबगार आहोत. आपण म्हणजे आपण आधुनिक युगातील युवक. हे काही खरं नाही.

Saturday, January 07, 2012 AT 10:33 PM (IST)

किशोर पेटकर, 9881099261 फलंदाजांचे नंदनवन मानले जाणाऱ्या सिडनी क्रिकेट मैदानावर भारताचा डाव आणि 68 धावांनी पराभव झाला, महेंद्रसिंह धोनीच्या संघाने एकदम कमजोर प्रदर्शन केल्यामुळे ऑस्ट्रेलियाने मालिकेत 2-0 अशी न गमावणारी आघाडी घेतली. मेलबर्नपाठोपाठ सिडनीला भारतीय फलंदाजीची वाताहत झाली.

Saturday, January 07, 2012 AT 11:00 AM (IST)

पाच राज्यांत, त्यातही उत्तर प्रदेशात आपले सामर्थ्य वाढणे हे भाजप व कॉंग्रेसच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. विधानसभेच्या जास्त जागा वाढल्यास राज्यसभेतही जागा वाढतील आणि लोकपाल व भूसंपादन विधेयक मंजूर करून घेता येईल, हा कॉंग्रेसचा विचार आहे. कॉंग्रेसची सरशी झाल्यास भाजपचा स्वप्नभंग होईल. शिवाय टीम अण्णाच्या प्रयत्नावर विरजण पडेल. चळवळ संपणार नाही पण तिचा जोर ओसरेल. तो ओसरला, की भाजपचाही विरस होईल.

Saturday, January 07, 2012 AT 10:14 PM (IST)

- नितीन को रगावकर गोव्याच्या भजनी परंपरेचे अध्वर्यू भजनसम्राट कै. मनोहरबुवा शिरगावकर यांचे सुपुत्र ज्येष्ठ गोमंतकीय भजनी कलाकार, कुशल हार्मोनियमवादक व संगीतकार नारायण ऊर्फ नाना शिरगावकर ज्यांनी आपल्या वडिलांचा भजन कलेचा, संगीत नाटकांचा वारसा समर्थपणे पुढे नेला ते आज आमच्यातून निघून गेलेत ही घटना एकूण इथल्या समृद्ध भजन परंपरेच्या दृष्टीने क्‍लेशदायक आहे. त्यांच्या जाण्याने मनोहरबुवांच्या भजन परंपरेचा चालता-बोलता इतिहास खंडित झाला आहे.

Sunday, December 18, 2011 AT 01:00 AM (IST)

 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: