Last Update:
 
संपादकीय

पणजी, ता. 23 - राज्यात शैक्षणिक पातळीवर पहिलीपासून मराठी किंवा कोकणी विषयाची सक्ती असावी, असा सल्ला राजभाषा सल्लागार समितीने सरकारला आज दिला. त्यासंदर्भात रीतसर प्रस्ताव सरकारला पाठवण्यात येणार असून अंतिम निर्णय सरकार घेईल, अशी माहिती राजभाषा संचालक प्रकाश वजरीकर यांनी आज त्यांच्याशी संपर्क साधला असता दिली. राजभाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री मनोहर यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली.

Sunday, March 24, 2013 AT 03:00 AM (IST)

मुक्त गोव्याचे सुवर्ण महोत्सव साजरे करणारे पहिले मराठी दैनिक असण्याचा मान संपादन करणारा "गोमन्तक' आज एकावन्नावा वर्धापनदिन साजरा करीत आहे. गेल्या अर्धशतकी कालखंडात "गोमन्तक'ने आपली लोकमान्य, लोकप्रिय नाममुद्रा प्रस्थापित केली आहे. सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक, औद्योगिक आदी सर्वच क्षेत्रांतील विषय "गोमन्तक'ने निष्पक्षपातीपणे आणि आंतरिक तळमळीने हाताळले आहेत.

Sunday, March 24, 2013 AT 01:02 AM (IST)

पणजी, ता. 23 - गोव्यात शिमगोत्सवाची ओस्सय घुमू लागली असून पणजीच्या शिमगोत्सवाला पर्यटन खात्याने तरंग, लालखी, गुढ्यांची सार्वजनिक जोड देण्याचा निर्णय घेतला आहे. पणजी शिमगोत्सव समिती आयोजित चित्ररथ मिरवणूक शनिवारी (ता. 30) होणार असून लावणी लावण्य जल्लोष, लख लख चंदेरी हा महाराष्ट्रातील लोककलेचे दर्शन घडवणारा कार्यक्रम होणार आहे.

Sunday, March 24, 2013 AT 01:05 AM (IST)

"एसएनके इव्हेंट्‌स' आणि "तरंगिणी'तर्फे 14 एप्रिल रोजी कला अकादमीत कार्यक्रमाचे आयोजन पणजी, ता. 23 ः सुरांच्या साहाय्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतातील व जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज... त्या गळ्याला गाता येत नाही असे कुठलेच गाणे नाही... तो आवाज चैतन्य निर्माण करू शकत नाही अशी कुठलीच मैफल नाही... त्या गळ्याला त्याज्य आहे असा कुठलाच संगीत प्रकार नाही... असाच आवाज म्हणजे आशा भोसले यांचा. हा आवाज प्रथमच गोमंतकात गुंजणार आहे.

Sunday, March 24, 2013 AT 01:04 AM (IST)

इये गोमंतनगरी नरेंद्र हेमू तारी गेले सहा महिने राज्यातील खाणी बंदच आहेत. सर्वोच्च न्यायालयात असलेला खाण प्रश्‍न आज, उद्या सुटेल अशा भाबड्या आशेत खाण अवलंबित आहेत, पण सगळ्या बाबी तपासूनच मग निर्णय प्रक्रिया सुरू होणार असल्याने यंदाचा खाण "सीझन' हातातून गेल्यातच जमा आहे. गेले दोन महिने फेब्रुवारी न पेक्षा मार्चमध्ये राज्यातील कायदेशीर खाणी सुरू होणार या अपेक्षेत हे लोक होते.

Friday, March 01, 2013 AT 11:18 PM (IST)

खासगी प्रवासी बसवाल्यांकडून केल्या जाणाऱ्या सतावणुकीविरुद्ध महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय विद्यार्थ्यांच्या मनात दाटलेला असंतोष मागील तीन दिवस आंदोलनातून प्रकटला आहे. फोंडा, मडगाव आणि पणजीत खासगी बसेस अडवून विद्यार्थ्यांनी आपल्या तक्रारींकडे सर्वांचेच लक्ष वेधले.

Friday, February 22, 2013 AT 12:47 AM (IST)

पर्जन्यमान असलेल्या गोव्यासारख्या छोट्या प्रांतातही चोवीस तास हवा तेव्हा पाणीपुरवठा अजून तरी स्वप्नच आहे. जलशुद्धीकरण प्रकल्पाकडील अडचणीमुळे तर कधी वितरणव्यवस्थेत अचानक उद्‌भवणाऱ्या समस्यांमुळे काही भागात पाणीपुरवठा खंडित होतो. समस्येचे निवारण होताच तो पूर्ववत सुरू होतो तर अनेकदा समस्या दूर करण्यात बराच कालावधी निघून जात असल्याने पाणीपुरवठा पूर्णतः ठप्प होण्याचा किंवा अपुऱ्या पाणीपुरवठ्यावर भागविण्याचा प्रसंग लोकांवर ओढवतो.

Wednesday, August 29, 2012 AT 02:00 AM (IST)

झिरो टॉलरन्स टू करप्शनची घोषणा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सत्तास्थानी येतानाच करण्यास प्रारंभ केला होता. परिवर्तनातून लोकांनी निवडून दिलेले सरकार सत्तेत आल्यास पाच महिने पूर्ण झाले आहेत. अधूनमधून झिरो टॉलरन्स टू करप्शनची नारेबाजी करीत चालू आठवड्यात भारताच्या स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणानंतर भ्रष्टाचारातून मुक्तता देण्याचा पुनरुच्चार केला आहे.

Friday, August 17, 2012 AT 09:58 PM (IST)

हिंदू जनजागृती समितीतर्फे रामनाथीला गेल्या महिन्यात अखिल भारतीय हिंदू अधिवेशन घेण्यात आले. त्यात कर्नाटकातील श्रीराम सेनेची शाखा गोव्यात सुरू करणार असल्याची घोषणा सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी केली होती. एकदा अशी शाखा व तिच्यामार्फत सेनेचे काम सुरू झाले, की धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपद्रव निर्माण होईल, समाजात अशांतता वाढेल या चिंतेने अनेकांना ग्रासले.

Friday, July 20, 2012 AT 02:00 AM (IST)

गोव्याचे भवितव्य स्वतःला आर्थिक आणि सांस्कृतिक घडामोडींचे कौशल्यप्रधान केंद्र म्हणून विकसित करण्यातच दडले आहे, असे स्पष्ट मत डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आपल्या अहवालात व्यक्त केले आहे. गोवा हे 2035 मध्ये एक समृद्ध राज्य असेल व असावे असे स्वप्न डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या समितीने आपल्या अहवालात रेखाटले आहे.

Thursday, July 19, 2012 AT 02:00 AM (IST)

मुलीच्या लग्नाला येणाऱ्या आवाक्‍याबाहेरच्या खर्चाचा बोजा कमी करावा म्हणून सरकारने तिच्या लग्नासाठी 1 लाख रु. ची आर्थिक मदत देणारी "लाडली लक्ष्मी' योजना जाहीर केली आणि तातडीने म्हणजे 1 एप्रिलपासून ती लागूही केली. मात्र त्यातल्या काही तरतुदींवर बोट ठेवून, ती योजना ज्या पद्धतीने राबवली जात आहे त्याबाबत आक्षेप घेतला जात आहे. खरे तर सरकारने कुठलीही योजना जाहीर केली की पुढचे काम सरकारच्या संबंधित खात्याने करायचे असते.

Monday, July 16, 2012 AT 02:00 AM (IST)

मुलीच्या लग्नाला येणाऱ्या आवाक्‍याबाहेरच्या खर्चाचा बोजा कमी करावा म्हणून सरकारने तिच्या लग्नासाठी 1 लाख रु. ची आर्थिक मदत देणारी "लाडली लक्ष्मी' योजना जाहीर केली आणि तातडीने म्हणजे 1 एप्रिलपासून ती लागूही केली. मात्र त्यातल्या काही तरतुदींवर बोट ठेवून, ती योजना ज्या पद्धतीने राबवली जात आहे त्याबाबत आक्षेप घेतला जात आहे. खरे तर सरकारने कुठलीही योजना जाहीर केली की पुढचे काम सरकारच्या संबंधित खात्याने करायचे असते.

Monday, July 16, 2012 AT 12:25 AM (IST)

सरकारच्या कारकिर्दीत, विशेषतः निवडणूकपूर्व वर्षभराच्या काळात झालेल्या नोकरभरतीसंदर्भात कारवाईचा फास आवळला जाऊ लागला आहे. आरोग्य खात्यातील तीनशे वीस कर्मचाऱ्याची भरती रद्द करण्याचा निर्णय सरकारने जाहीर करताना खाण, सहकार, अबकारी, पंचायत प्रशासन आदी खात्यांतील नोकरभरतीचाही छडा लावण्याचा इरादा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केला. कारवाईच्या झळांचा रोख अन्य खात्यांकडे वळू लागणार असल्याने आणखीन हजारबाराशे जणांच्या नोकऱ्या संकटात आल्या आहेत.

Thursday, July 12, 2012 AT 02:00 AM (IST)

राज्य सरकारने विद्यार्थ्यांना कन्याकुमारीची सैर करून आणण्याची घोषणा केली. तसे उपक्रम सरकारने राबवायलाच हवेत. मात्र यापूर्वी त्यांनी पडीक शेती लागवडीखाली आणण्याचे व्यक्त केलेले स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठीही याच विद्यार्थ्यांकडे लक्ष देण्याची गरज नाही. शेती परवडत नाही म्हणून शेतीकडे कोणी वळत नाही हे झाले वरवरचे विश्‍लेषण. खरेतर बालवर्गापासून पदवीपर्यंतच्या शिक्षणात शेती कुठेच डोकावत नाही.

Friday, July 06, 2012 AT 02:00 AM (IST)

तांत्रिकी शिक्षण क्षेत्रात गोव्यात गेल्या वर्ष दोन वर्षांत झपाट्याने होत आहेत. यंदा वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या 50 तर गेल्यावर्षीपासून यंदापर्यंत अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी 35 टक्के जागा वाढल्या. प्रयत्नातून, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या भूखंड देण्यासंबंधीच्या कठोर भूमिकेतून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीसारख्या संस्था (एनआयटी) फक्त गोमंतकीयांसाठी 50 टक्के जागा द्यायला तयार झाली.

Friday, June 29, 2012 AT 10:11 PM (IST)

म्हादई पाणी वाटप तंटा लवादाची कार्यवाही होण्यास चालढकल होत असून ही प्रक्रिया जलद गतीने व्हावी यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अर्जावर आता 23 जुलै रोजी सुनावणी होणार असल्याचे वाचनात आले आहे.  दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.

Tuesday, June 26, 2012 AT 02:15 AM (IST)

धो धो पावसात 18 जून क्रांतिदिनाचा आझाद मैदानावरील मुख्य कार्यक्रम आटोपल्यानंतर शहराचा एक फेरफटका मारताना गोव्याच्या राजधानीतील कानाकोपऱ्यात काय साचले आहे, काय दडले आहे, काय वाहून गेले आहे आणि काय बुडणार आहे याचा अंदाज आला. संध्याकाळपर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद पणजीत झाल्याची माहिती मिळाली त्यावेळी पावसाने पणजीवासीयांचा का पिच्छा पुरवला असावा याचे विचारचक्र सुरू झाले.

Saturday, June 23, 2012 AT 02:00 AM (IST)

धो धो पावसात 18 जून क्रांतिदिनाचा आझाद मैदानावरील मुख्य कार्यक्रम आटोपल्यानंतर शहराचा एक फेरफटका मारताना गोव्याच्या राजधानीतील कानाकोपऱ्यात काय साचले आहे, काय दडले आहे, काय वाहून गेले आहे आणि काय बुडणार आहे याचा अंदाज आला. संध्याकाळपर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद पणजीत झाल्याची माहिती मिळाली त्यावेळी पावसाने पणजीवासीयांचा का पिच्छा पुरवला असावा याचे विचारचक्र सुरू झाले.

Saturday, June 23, 2012 AT 02:00 AM (IST)

एखाद्या राज्य सरकारचे शंभर दिवस पूर्ण होणे तसे महत्त्वाचे नव्हे, किंबहुना शंभर दिवसांचा कालावधी कोणत्याही नव्या सरकारला सुधारणांसाठी अल्पच आहे. मात्र गोव्यात सध्या आठ वर्षांच्या कालावधीनंतर सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी दिलेल्या आश्‍वासनांची पूर्ती कशी होते यापेक्षा ती कधी होते याला महत्त्व आले आहे.

Saturday, June 16, 2012 AT 02:00 AM (IST)

1975 साली 7 भारतीय रुपये म्हणजे एक अमेरिकी डॉलर असे मूल्य होते! त्याच डॉलरला सध्या 55 रुपये 3 पैसे मोजावे लागतात!! ही नीचांकी घसरण चिंताजनक असल्यानेच रिझर्व्ह बॅंकेला, रुपयाचे अवमूल्यन रोखण्यासाठी हस्तक्षेप करायचा निर्णय घ्यावा लागला.

Thursday, June 14, 2012 AT 10:02 PM (IST)

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या विविध निर्णयांमुळे राज्यातील शिक्षणक्षेत्रासमोर अनेक प्रश्‍नांची मालिका उभी राहणार आहे. यामध्ये सर्वसामान्य माणूस कालांतराने शिक्षणापासून हद्दपार होतोय, की काय याचीच भीती वाटू लागली आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षणाप्रती कळवळा असणाऱ्या नागरिकांनी सरकारच्या या (अ)शैक्षणिक धोरणाकडे फक्त भाषामाध्यमाच्या प्रश्‍नाच्याच चष्म्यातून न पाहता, शिक्षणाच्या सर्वांगीण विकासाच्या नजरेतून पाहणेही अत्यंत आवश्‍यक बनले आहे.

Thursday, June 14, 2012 AT 02:00 AM (IST)

पंचायतीच्या निवडणुका नुकत्याच यशस्वीपणे पार पडल्या. 185 पंचायतींमधून 1481 पंच पंचायतींवर पोचले आहेत. पंचायती राजच्या यशस्वीतेच्या दृष्टीने ही बाब मोठी असली तरी पंचायतीवर कब्जा मिळवण्यासाठी जी जीवघेणी स्पर्धा चालू आहे ती बाब फार चिंताजनक आहे. याबाबत तोडगा काढण्याबाबत सरकारने विचार करणे आवश्‍यक आहे.    पंचायत निवडणूक ही पक्षविरहित असते.

Tuesday, June 12, 2012 AT 02:00 AM (IST)

कॉंग्रेसच्या दिगंबर कामत सरकारने आणलेल्या प्राथमिक शिक्षणाच्या इंग्रजीकरणाच्या धोरणाला कडाडून विरोध करणाऱ्या भारतीय भाषा सुरक्षा मंचाचा लढाऊपणा गळून पडला आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुंतागुंतीच्या बनलेल्या माध्यमप्रश्‍नावर तोडगा काढल्यानंतर मंचाने त्यासंबंधी चर्चा करण्यासाठी व आपली भूमिका ठरविण्यासाठी बोलावली होती. खुद्द मुख्यमंत्रीच या बैठकीत सहभागी झाल्याने बहुधा लढण्याविषयी थोडीफार असलेली धुगधुगीही मावळली असावी.

Monday, June 11, 2012 AT 02:30 AM (IST)

सोलापूर शहरात कवित्रय राहत असे. या कवित्रयातील शेवटचा दुवाही शनिवारी निखळला. कविवर्य संजीव, रा. ना. पवार आणि दत्ता हलसगीकर या तीन कवींमुळे स्वातंत्र्योत्तर कवितेच्या प्रांतात सोलापूरचा नावलौकिक वाढला होता. कवी संजीव हे तापट स्वभावाचे होते. रा. ना. पवार हेही फारसे कुणात मिसळत नसत. आपल्याच कवितेच्या विश्‍वात ते रममाण होत असतं. दत्ता हलसगीकर हे मात्र जनमानसात मिसळणारे कवी होते. नवोदितांचे ते आधारस्तंभ होते.

Monday, June 11, 2012 AT 02:00 AM (IST)

भारताचा सुपर ग्रॅंडमास्टर विश्‍वनाथन आनंद बुद्धिबळात पाचव्यांदा जगज्जेता बनला, त्यामुळे भारतीय बुद्धिबळ जगतात आनंददायी वातावरण असताना, उझबेकिस्तानमधील ताश्‍कंद येथे गोव्याची इव्हाना फुर्तादो हिने आशियायी ज्युनिअर बुद्धिबळात मुलींच्या गटात विजेतेपदाला गवसणी घातली. पुन्हा एकदा ती बुद्धिबळातील चौसष्ट घरांची "क्‍वीन' ठरली. आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक जिंकणे हे काही इव्हानासाठी अप्रूप नाही.

Friday, June 08, 2012 AT 10:20 PM (IST)

 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: