Last Update:
 
सदरे

""जो देईल दारू, आणि मटण, आम्ही दाबू त्याचे बटण'' हे घोषवाक्‍य घेऊन मतदान करणाऱ्या मतदारमंडळींना सध्या बरे दिवस आलेले दिसतात. गोव्याचं ठाऊक नाही. पण महाराष्ट्रात मात्र सध्या व्होट आणि नोट यांचं सख्य सर्वश्रुत आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हापरिषद ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत दोन लाख बोकडांना जीव गमवावा लागला व दारूचे अक्षरशः पाट वाहिले अशा बातम्या वृत्तपत्रांतून झळकल्या आणि त्या खऱ्या असल्याचे प्रत्यक्षात पाहायला-अनुभवायलाही मिळाले.

Monday, March 26, 2012 AT 10:17 PM (IST)

1993 पासून सुरू झालेल्या "सॅफ' करंडक स्पर्धेची नववी आवृत्ती यंदा नवी दिल्लीतील भव्य जवाहरलाल नेहरू स्टेडिअमवर रंगली. पुन्हा एकदा "सॅफ' गटात भारताचे वर्चस्व राहिले. अंतिम लढतीत अफगाणिस्तानला 4-0 असे हरवून भारताने सहाव्यांदा ही स्पर्धा जिंकली. दक्षिण आशियाई फुटबॉलमध्ये भारतच श्रेष्ठ आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

Saturday, December 17, 2011 AT 09:57 PM (IST)

तु मच्या आमच्या अवतीभोवती दोन प्रकारची माणसं वावरत असतात. त्यातला काहींचा स्वत:बद्दलचा आत्मविश्‍वास ऊतू जात असतो, तर काहींना आत्मविश्वास कशाशी खातात याचीच जाण नसते. आमच्या भाऊरावांच्या आत्मविश्वासाचे घोडे पेंड खाते! देव आत्मविश्वास वाटत असताना ते कोठे होते, तेच जाणोत.

Monday, December 05, 2011 AT 01:30 AM (IST)

"रा वन' या चित्रपटाने पुन्हा आपण भारतीय सिनेसृष्टीचा बादशहा असल्याचे सिद्ध केल्यानंतर किंग खान लहान थोरांचा लाडका शाहरुख खान भारतातील सिनेमाच्या बादशहाला अर्थात भारताच्या 42व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आज गोव्यात सलामी देणार आहे. 42 वर्षांचा झाला तरी इफ्फी गोव्यासाठी आठ वर्षांचाच. राजधानी पणजीतून आज उद्‌घाटनासाठी "इफ्फी' यंदा मडगावला चालला तरी उद्यापासून "इफ्फी'ची धूम नटलेल्या पणजीतील मांडवीकाठी रंगणार आहे.

Wednesday, November 23, 2011 AT 05:15 AM (IST)

नो करी मिळणे ही जीवनावश्‍यक बाब पूर्वीही सोपी नव्हती आणि आजही सहजासहजी नोकरी मिळून गेली असे घडत नाही. खूप खूप शिक्षणाच्या पदव्या आपल्या नावापुढे लावणाऱ्या नरपुंगवांना वा एखाद्या विशिष्ट क्षेत्रात असामान्य प्रावीण्य मिळवणाऱ्यांना नोकरी पट्‌द्‌÷िदशी मिळून जाते, पण अनेकांना नोकरीसाठी आस्थापनांमागून आस्थापनांचे उंबरठे झिजवावे लागतात. नोकरी लागली म्हणून ती टिकून राहिली अशातलीही बाब नसते.

Wednesday, November 23, 2011 AT 02:15 AM (IST)

आ ज 23 नोव्हेंबरला 42 व्या इफ्फीचे उद्‌घाटन होत आहे. गोव्यातील हा आठवा इफ्फी. 2004 साली इफ्फी ने गोव्यात प्रवेश केला. गोवा हे इफ्फीचे कायमचे केंद्र असे त्यावेळी जाहीर केले असले तरी इफ्फीला गोव्यातून हलविण्याचे प्रयत्न बऱ्याच घटकांकडून केले गेले. गोव्यातील इफ्फीच्या आयोजनावरही बरीच टीका होत राहिली.

Wednesday, November 23, 2011 AT 02:00 AM (IST)

कष्टांसाठी हे जीवन नाही पण या जीवनासाठीच हे कष्ट आहेत जीवनाच्या शर्यतीत जिंकण्यासाठी सर्वांचीच धावपळ सुरू आहे पण खरंच जगतो का आपण हे जीवन वाटतं आपल्याला जगावं असं? विचार करायचा का विषयावरती घेऊया का जरा क्षणभर विश्रांती... ख रंच आपल्याला नाही का वाटत आपण जगणं विसरत चाललोय. इकडेतिकडे जणू आपण यांत्रिक मानव कसे फिरत असतो. जसं एखाद्या रोबोमध्ये सगळे प्रोग्रॅम फिट केलेले असतात आणि तो त्याप्रमाणे आपली कामं करत असतो.

Wednesday, November 23, 2011 AT 12:30 AM (IST)

जोशी आजीचे पती लग्नानंतर पाच वर्षांतच हार्टऍटॅकने वारले. पोटच्या छोट्या राकेशला सांभाळण्याची जबाबदारी अल्पशिक्षित गृहिणी असलेल्या जोशी आजींवर येऊन पडली. जवळचे वाटणारे सर्व नातलग दूर निघून गेले आणि वयाच्या सत्ताविसाव्या वर्षीच इतरांच्या घरी स्वयंपाकपाणी करून आपले व मुलांचे पोट भरण्याची जबाबदारी जोशी आजींवर येऊन पडली. अल्पावधीत उत्तम स्वयंपाकीण म्हणून नाव कमावत त्यांनी चार पैसे गाठीला जोडले.  मुलाचे शिक्षण केले. सर्व हट्ट पुरवले.

Tuesday, November 22, 2011 AT 01:45 AM (IST)

विधानसभा निवडणूक झाल्यानंतर पहिल्या अधिवेशनाच्या सुरवातीला आणि त्यानंतर वर्षाच्या पहिल्या अधिवेशनाच्या सुरवातीला राज्यपाल सभागृहाला उद्देशून अभिभाषण करतात. मात्र निवडणुकीनंतर झालेल्या पहिल्या अधिवेशनात सभासदांना शपथ आणि सभापतींची निवडणूक राज्यपालांच्या अभिभाषणापूर्वी होते. राज्यपालांचे अभिभाषण झाले की सचिव त्याची प्रत सभागृहाच्या पटलावर ठेवतात.

Monday, November 21, 2011 AT 01:45 AM (IST)

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याने पंधरा वर्षांपूर्वीच्या सामन्यात "फिक्‍सिंग' झाल्याची शक्‍यता बोलून दाखवल्याबरोबर संपूर्ण क्रिकेट विश्वातच जी खळबळ उडाली आहे त्याविषयी "दूध का दूध-और पानी का पानी' करण्याच्या हेतूने मी विनोदशी गाठभेट घेतली आणि विचारलं, "विनोद, तुझ्या नावातच विनोद आहे म्हणून विचारतोय..

Monday, November 21, 2011 AT 01:45 AM (IST)

 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2011 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: