Last Update:
 
नारी.कॉम

पूर्वी कमरेचे बेल्ट म्हणजेच पट्टे वापरणे ही पुरूषांपर्यंत सीमित अशी वस्तू होती. परंतु कालांतराने महिला पॅन्ट वापरू लागल्या व त्यासाठी त्यांनीही बेल्टचा वापर सुरू केला. प्रथम पुरुषांना व मग महिलांना हा बेल्ट अत्यावश्‍यक व फॅशनचा एक लुक देणाराही ठरला. त्यानंतर राजेश खन्नासारख्या सुपरस्टारने पॅन्टवर सदऱ्यासारखे लांबीचे पूर्ण बाह्यांचे शर्ट, त्यावर बाहेर बेल्ट ही आगळीवेगळी स्वतंत्र शैलीची फॅशन अस्तित्वात आणली व ती बऱ्याच प्रमाणात चाललीही.

Monday, March 26, 2012 AT 10:05 PM (IST)

दे हव्यापार थांबवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. पोलिस खाते, महिला आणि बाल कल्याण खाते, महिला आयोग यांच्या मदतीने सरकार अनेक कार्यक्रम, योजना राबवून देहव्यापार थांबवण्यासाठी सक्रिय आहे. सर्वसाधारणपणे यासाठी पुढील कार्यक्रम राबविले जातात. 1) पोलिस खात्यातर्फे लोकांमध्ये जागृती केली जाते. 2) या व्यवसायाचे बळी ठरलेल्यांना संरक्षण दिले जाते. 3) जे दलाल या व्यवसायात गुंतलेले आहेत, त्यांना अटक करून कोठडीत टाकले जाते.

Thursday, December 29, 2011 AT 01:00 AM (IST)

आ पल्या देशात मानवी देहव्यापार चालतो, हे सर्वश्रुत आहे. देहव्यापाराची आपल्याला चीड येते. आपण पोटतिडकीने बोलतो. हे सारे थांबावे असेही आपल्याला मनापासून वाटते. पण या गुन्ह्यांची, अन्यायाची पाळेमुळे इतकी खोलवर रुजलेली आहेत. कधी जबरदस्तीने, तर कधी ब्लॅकमेल करून, कधी दमदाटी, भय दाखवून, अत्याचार करून किंवा स्वखुशीने आईबापाच्या सांगण्यावरून मुली या फंदात पडतात. एकदा का पडल्या, की त्यातून सहीसलामत बाहेर येणे फार कठीण असते.

Thursday, December 15, 2011 AT 01:00 AM (IST)

माझी आणि प्रदीपची ओळख एका एकांकिकेदरम्यान झाली. नंतर मैत्री, प्रेम आणि विवाह हे आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे होते. विवाहानंतर स्थिरस्थावर होण्यात काही अडचणी आल्या तरी परस्पर सामंजस्य आणि विश्‍वासाने त्यावर मात केली. एकमेकांची काळजी घेणे, समजून घेणे यातूनच पती-पत्नीतील नाते अधिक परिपक्‍व होत जाते, हे पटल्यामुळेच मनाचे मनाशी जुळलेले नाते कायम आहे. नु कतीच मी एका असाध्य व्याधीतून बरी झाले. ते काही दिवस आमच्या कुटुंबासाठी कसोटीचे होते.

Tuesday, December 13, 2011 AT 01:00 AM (IST)

नृ त्य हे आपल्या भारतीय संस्कृतीचे प्राचीन रूप आहे. मोहेंजोदाडो आणि हडप्पा संस्कृतीमध्येही उत्खननात सापडलेली नर्तिकेची नृत्यमुद्रा हेच सांगते, की नृत्य हे भारताच्या प्राचीन संस्कृतीशी जोडलेले आहे. या नृत्याचे अनेक प्रकार आहेत. भरतनाट्यम हा नृत्याचा प्रकार आज लोकप्रिय आहे. भरतनाट्यम ही नृत्यशैली भरतमुनींच्या नाट्यशास्त्रावर आधारित आहे. या नृत्याचे सादरीकरण कर्नाटकी संगीताच्या साथीने होते.

Wednesday, November 23, 2011 AT 12:45 AM (IST)

आ जकाल कोणत्याही जिममध्ये पाऊल टाका, पूर्वीच्या हेल्दी फळांची, भाज्यांची किंवा योगासनाच्या पोझची पोस्टर जाऊन त्यांची जागा बॉलिवूडच्या नायक-नायिकांनी घेतलेली दिसते. तरुणांमध्ये हा ट्रेंड आधीपासून होता. तेथेही परदेशी हीरोंची जागा "देसी बॉइज'नी घेतली आहे, मग महिलांनी तरी मागे का राहावे? त्यांनाही आदर्श म्हणून करिनाची झीरो फिगर किंवा शिल्पाची फिगर ठेवावीशी वाटली तर काही गैर नाही.

Monday, November 21, 2011 AT 01:45 AM (IST)

- कविता प्रणीत आमोणकर फॅशन ही आजच्या युगाची एक गरज बनली आहे. परंतु फॅशनच्या नावाखाली जे काही बीभत्स प्रकार चाललेले दिसतात, ते पाहून सुसंस्कृत मनुष्याच्या नजरा झुकतात. मानवजातीची संस्कृती जेवढी प्राचीन आहे, फॅशनचे अस्तित्वदेखील तितकेच जुने आहे, असे म्हटले, तर ते वावगे ठरणार नाही.

Friday, November 18, 2011 AT 10:00 PM (IST)

अंजली मराठे- कुलकर्णी, गायिका मा झी आई अनुराधा मराठे गायिका आहे. त्यामुळं गाण्याचे संस्कार लहानपणापासूनच झाले. आई घरी गाण्याचे क्‍लास घ्यायची. त्या वेळी मी नुसती तिथं बसायचे. मी गाऊ शकते, हे त्या वेळी आईला माहीतही नव्हतं. मी तीन-साडेतीन वर्षांची असेन. एक दिवस आई क्‍लास संपवून आतल्या खोलीत गेली. मी पेटी घेऊन सूर लावले. ते ऐकून आई बाहेर आली. तिने मला वेगवेगळ्या पद्धतीत गायला सांगितलं आणि मी ते गायलंही. तेव्हा आईला माझ्यातील हा गुण समजला.

Friday, November 18, 2011 AT 09:55 PM (IST)

 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2011 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: