Last Update:
 
माझे शहर

मडगाव, ता. 6 (प्रतिनिधी) ः एकेकाळी व्यावसायिक राजधानी असलेल्या मडगाव शहरात चित्रपट हे एक करमणुकीचे मोठे साधन होते. त्यावेळी चित्रपटगृहांना बरीच मागणी होती. नवीन चित्रपट प्रदर्शित होताच तो चित्रपट पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. त्या उत्सुकतेनेच प्रेक्षकांचे पाय चित्रपटगृहांकडे वळायचे, पण गेल्या दोन दशकांपासून मोठ्या प्रमाणावर झालेल्या विविध खासगी दूरचित्रवाहिन्यांच्या आगमनामुळे प्रेक्षकवर्गाने चित्रपटगृहांकडे पाठ फिरवलेली आहे.

Thursday, September 06, 2012 AT 10:20 PM (IST)

डिचोली, ता. 31 (प्रतिनिधी) ः डिचोली शहरातील वाढत्या लोकसंख्येचा व जुन्या बाजारपेठेतील गैरसोयींचा विचार करून तत्कालीन पालिका मंडळाने नव्या मार्केट प्रकल्पाचे नियोजन केले आणि आता हा मार्केट प्रकल्प पूर्णत्वास आलेला आहे. त्यामुळे डिचोलीतील बाजारपेठेचे महत्त्व वाढणार आहे. जुन्या मार्केटमध्ये काळाप्रमाणे अधिक सुविधा नव्हत्या आणि मार्केटला देखणेपणही नव्हते. नव्या विस्तारित प्रकल्पाने मात्र हे देखणेपण धारण केलेले आहे.

Friday, August 31, 2012 AT 10:38 PM (IST)

पणजी, ता. 28 (प्रतिनिधी) ः एकेकाळी पणजीतील मुख्य मार्केटमध्ये जाणे नकोसे असायचे. ढकलाढकली, मार्केटमध्ये अंगावर उसळणारे घाणेरडे पाणी, कोंदट वातावरण अशी अवस्था होती. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या मागील कारकिर्दीत पणजीवासीयांना ऐसपैस, अत्याधुनिक सुरेख मार्केट प्रकल्प दिला. मार्केटची नवी नवलाई संपली आणि नंतर बेशिस्त, अस्वच्छतेचे पर्व सुरू झाले ते आजही संपलेले नाही.

Tuesday, August 28, 2012 AT 10:45 PM (IST)

मडगाव, ता. 27 (प्रतिनिधी) ः गोव्यात कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून मडगावातील दक्षिण-मध्य रेल्वेच्या जुन्या स्थानकाकडे दुर्लक्ष होत आहे. गोवा सरकार व दक्षिण-मध्य रेल्वेच्या सहकाऱ्याने जुन्या रेल्वे स्थानकावर बहुउद्देशीय प्रकल्प उभारण्याचे नियोजन केले होते, पण सध्या तेथे उभारण्यात येणारा मॉल प्रकल्प शीतपेटीत पडल्यातच जमा आहे.

Monday, August 27, 2012 AT 10:15 PM (IST)

म्हापसा, ता. 28 : म्हापसा पोलिस स्टेशन हे उत्तर गोव्यातील एक मोठे पोलिस स्थानक. या पोलिस स्थानकाची कार्यकक्षाही मोठी आहे. दरवर्षी पोलिस स्थानकात दाखल होणाऱ्या दखलपात्र गुन्ह्यांची आकडेवारी वाढत आहे. पोलिस स्थानकाच्या कामातही दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. या सर्व गोष्टींची दखल घेऊन या पोलिस स्थानकाचा दर्जा, सुविधा, साधनसामग्री, अधिकारी व पोलिसांची संख्या वाढायला हवी अन्यथा येणाऱ्या काळात अनेक समस्या निर्माण होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

Thursday, December 29, 2011 AT 01:00 AM (IST)

वाळपई, ता. 14 ः पाणी म्हणजे जीवन. पाण्याशिवाय मनुष्य जगूच शकत नाही. विविध कारणांमुळे अनेक ठिकाणी पाण्याची समस्या भेडसावत आहे. पण वाळपई नगरपालिका शहर तसेच सत्तरीतील अन्य पंचायतीत पाणी पुरवण्याचे काम सुरू आहे, ते वाळपई शहराला लागूनच असलेल्या दाबोस पाणी प्रकल्पातून. शहरासाठी हा प्रकल्प अमृतकलशच बनला आहे. शहरातील संपूर्ण प्रभागातील नागरिक या प्रकल्पावरच आजपर्यंत अवलंबून राहिले असून, या पाणी प्रकल्पाचा फायदा भविष्यातही लोकांना होणार आहे.

Thursday, December 15, 2011 AT 01:00 AM (IST)

वास्को, ता. 12 ः चिखली कुटीर रुग्णालयाचा विस्तार करणे, त्याचा दर्जा सुधारणे या गोष्टींना मुरगाव, वास्को, कुठ्ठाळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविणाऱ्यांनी आपल्या जाहीरनाम्यात खास स्थान दिले होते. परंतु गेल्या साडेचार वर्षात या रुग्णालयाचा दर्जा वाढला नाही, तसेच त्याठिकाणी नवीन इमारतही उभी राहिली नाही. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीतील जाहीरनाम्यात चिखली कुटीर रुग्णालयाच्या विस्तारीकरणाला पुन्हा स्थान मिळणार यात शंकाच नाही.

Tuesday, December 13, 2011 AT 01:00 AM (IST)

 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: