Last Update:
 
मनोरंजन

अंडरट्रायल, आयडी, गंगूबाई, भंवर, उडान, कूर्मावतार... ही आहेत, काही नावाजलेल्या चित्रपटांची नावं! पण तुम्ही म्हणाल, आम्ही तर कधीच ऐकले नाही, की या नावाचे चित्रपटही येऊन गेले. कदाचित भंगार असल्यामुळे डब्यात गेले असतील, त्यामुळे आपल्याला माहीत नाही, असा समज काही वाचक करून घेतील. शिवाय आठवड्याला किती पिक्‍चर येतात अन्‌ जातात...

Sunday, March 31, 2013 AT 04:53 PM (IST)

मुंबई- गुंतवणूक सल्लागार प्रिया मारवाह हिच्यासोबत अभिनेता जॉन अब्राहम लग्न करणार असल्याची खुसखुशीत चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये सुरू आहे. यावर बोलताना जॉन म्हणाला, की मी पत्नीशी एकनिष्ठ राहणार असून साधेपणा हा माझ्या जीवनसाथीतील सर्वांत मोठा गुण असेल.  गप्पांच्या ओघात बोलताना जॉन म्हणाला, की मी पत्नीशी एकनिष्ठ राहणारा व्यक्ती असून कायम असाच राहणार आहे. मी ज्या मुलीसोबत लग्न करेन तिच्यातील साधेपणा हा गुण माझ्यासाठी सर्वांत महत्त्वाचा असेल.

Tuesday, February 12, 2013 AT 07:04 PM (IST)

पणजी, ता. 11 - हिंदी आणि मराठी चित्रपटांत आपल्या अभिनयाचा चुणूक दाखवणारी उषा जाधव हिने, "आपली "धग' या चित्रपटातील भूमिका वेगळ्या प्रकारची होती. त्यामुळे पूर्वीचे केलेले काम विसरून ही भूमिका मी साकारली आहे. त्यासाठी गावातले जीवन जवळून बघितले, अनुभवले, अभ्यासले. या साऱ्यामुळे भूमिकेतून मला वेगळाच आनंद मिळाला', असे "गोमन्तक'शी बोलताना सांगितले.    काल गोवा मराठी चित्रपट महोत्सवात "धग' या चित्रपटाचा प्रिमियर आयोजित करण्यात आला होता.

Monday, June 11, 2012 AT 09:48 PM (IST)

पणजी, ता. 10 - आताच्या टीव्हीवरील मालिकांचा वास्तवाशी काही संबंधच उरलेला नाही. त्या मला बघवत नाहीत. बघताना कुठेतरी उद्विग्नता येते. इतक्‍या त्या निरर्थक गोष्टींनी भरलेल्या असतात. तेव्हा मी त्यात आता बसणार नाही, तो व्याप वेगळा झाला आहे. त्यामुळे मला आता कोणी मानेवर सुरा ठेवून बजावले, तरी मालिका करणार नाही, असे ख्यातनाम चित्रपट निर्मात्या सई परांजपे यांनी सांगितले.  पणजी येथे झालेल्या पाचव्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवात आज (ता.

Sunday, June 10, 2012 AT 09:22 PM (IST)

पणजी, ता. 10- आपल्या जीवनाच्या विकासाआड येणाऱ्या प्रत्येक अपयशाशी कडवा संघर्ष मांडणारी व प्रख्यात भारतीय मसाले ब्रॅंडचे मालक हुकुमचंदजी चोराडीया यांच्या आयुष्यावर आधारलेली कथा व त्यावर आधारित "मसाला' हा अपयशाने खचून न जाता पुढे जावे, त्यातून यश मिळवता येते... असा संदेश देणारा चित्रपट मराठी चित्रपट महोत्सवात पाहताना आज रसिक भारावून गेले.

Sunday, June 10, 2012 AT 09:25 PM (IST)

पणजी, ता. 24 ः गोव्यात येत्या 8 ते 11 जूनपर्यंत आयोजित केलेल्या मराठी चित्रपट महोत्सवासाठी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी "मूव्ही मॉन्सून मॅजिक' खास सवलतींची विशेष जाहिरातबाजी मोहीम पर्यटन विकास महामंडळाने सुरू केली आहे. महामंडळाच्या संकेतस्थळावरून केल्या जाणाऱ्या या जाहिरातबाजीतून मराठी चित्रपट महोत्सव साता समुद्रापल्याड पोचवण्याचे कामही महामंडळाने केले आहे. महामंडळाच्या पणजी व मिरामार रेसिडेन्सीपुरती ही सवलत आहे.

Thursday, May 24, 2012 AT 09:42 PM (IST)

लखनौ, ता. 19 (वृत्तसंस्था): "द डर्टी पिक्‍चर' हा केबल टेलिव्हिजन नेटवर्कच्या नियमांनुसार "ए ग्रेड'साठी ठरवून दिलेल्या वेळेत प्रसारित करावा, असे निर्देश आज अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने एका खासगी वाहिनीला दिले आणि तशी हमी घेण्याचे माहिती आणि प्रसारण मंत्रालयास सांगितले आहे. त्यानुसार हा चित्रपट रात्री उशिरा दाखविण्यात यावा, असे म्हटले आहे.

Friday, April 20, 2012 AT 02:03 AM (IST)

मुंबई - "क्रिश-3' हा हृतिक रोशनचा महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. त्यामुळे या चित्रपटाकडे संपूर्ण लक्ष देण्यासाठी मुंबईतील चित्रीकरणादरम्यानही त्या ने घर सोडून हॉटेलात मुक्काम ठोकला आहे. "क्रिश-3'चे चित्रीकरण गोरेगावातील चित्रनगरीत सुरू आहे. जुहू येथे राहणाऱ्या हृतिकने फिल्मसिटीत जाण्यासाठी लागणारा वेळ वाचवण्याच्या हेतूने गोरेगावातील एका पंचतारांकित हॉटेलात वास्तव्य केले आहे. त्या हॉटेलातील एक "सूट' त्याने राखून ठेवला आहे.

Sunday, April 15, 2012 AT 08:52 PM (IST)

आमिर खानला मिस्टर परफेक्शनिस्ट असं का म्हणतात ते आपणा सगळ्यांनाच माहिती आहे. आता याच परफेक्शनिस्टने आपलं परफेक्शन आणखी एका गोष्टीतून सिद्ध केलंय. कोणती आहे ती गोष्ट? कोणताही गेम शो नाही, कोणताही चॅट शो नाही, आपल्या टेलिव्हिजन डेब्यूसाठी आमिर खानने निवडला अतिशय वेगळा मार्ग. एक रिऍलिस्टिक शो सत्यमेव जयते. देशातल्या दुर्गम भागांत राहणाऱ्या सामान्य लोकांच्या सत्यस्थितीवर आधारित हा शो आहे.

Sunday, April 15, 2012 AT 08:47 PM (IST)

संगीत संयोजक मिथिलेश पाटणकर यांचा मुलगा विदित हा द थ्री जी बॉय लवकरच आपला  पहिला वहिला अल्बम घेऊन रसिकांच्या भेटीला येतोय. त्याचे आजोबा विश्वास पाटणकर यांनी संगीतबद्ध केलेली बालगीतं त्यानं या अल्बममध्ये गायलीत. बालगीतं हा लहान मुलांसाठी नेहमीच आवडता विषय असतो. नेमकी हीच गोष्ट हेरून विश्वास पाटणकर यांनी आपला नातू  विदितचा पहिला वहीला अल्बम करायचं ठरवलं. मुलांना आवडणाऱ्या विषयांवर ही गाणी आधारित आहेत.

Sunday, April 15, 2012 AT 08:48 PM (IST)

मुंबई. 1 - ज्येष्ठ संगीतकार अनिल मोहिले (वय 71) यांचे हृदयविकाराने राहत्या घरी निधन झाले. मराठी चित्रपटातील संगीत क्षेत्रात त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. त्यांनी आतापर्यंत 86 चित्रपटांचे संगीत संयोजन केले. अष्टविनायकपासून माहेरीची साडीपर्यंत तसेच थरथराट, दे दणादण, धडाकेबाज, झपाटलेला अशा अनेक चित्रपटाचे संगीत संयोजन विशेष गाजले. थोडिसी बेपर्वाई, अभिमान, लेकिन, डॉन, शराबी अशा अजरामर ठरलेल्या चित्रपटांसाठीही त्यांचे संगीत संयोजन होते.

Wednesday, February 01, 2012 AT 05:18 PM (IST)

मुंबई, 27   - अभिनेत्री विद्या बालनने आपल्या आगामी कहाणी या चित्रपटाची प्रसिद्धी चित्रपटातील गेट-अपवरच केली. 

Friday, January 27, 2012 AT 08:57 PM (IST)

मुंबई, 27 -  'वाय धीस कोलावेरी डी' म्हणत रातोरात तरुणांच्या गळ्यातला ताईत बनलेला रजनीकांतचा जावई धनुष आता हिंदी चित्रपटात आपले भविष्य आजमावणार आहे. त्याने नुकताच आपला पहिला वहिला चित्रपट साईन केला आहे.   दाक्षिणात्या चित्रपटांमधील लोकप्रिय अभिनेता आणि गायक धनुष दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.  रांझणा या रोमॅंटिक चित्रपटात तो भूमिका करतोय.

Friday, January 27, 2012 AT 08:55 PM (IST)

दू रचित्रवाणी वाहिन्यांवरील मालिका असोत, की रिऍलिटी शो, आज भारतीय प्रेक्षकांना परदेशातून "आयात' केलेले कार्यक्रम बघण्याची सवय लागली आहे. पण मुळात "तिकडच्या' कल्पना उचलण्याची वेळ भारतीय वाहिन्यांवर का यावी? एक काळ असा होता, की घरातली एखादी गोष्ट इंपोर्टेड आहे, असं आवर्जून सांगितलं जाई. नंतर "हल्ली आपल्याकडेही सगळं मिळतं हो'चा जमाना आला.

Wednesday, January 25, 2012 AT 01:45 AM (IST)

नागपूर, 24 - कॉपीराइट कायद्याचा उल्लंघन केल्याने बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि प्रियांका चोप्रा यांची प्रमुख भूमिका असलेला "अग्निपथ' या हिंदी चित्रपटातील एका गाण्यावर जिल्हा सत्र न्यायालयाने बंदी घातली आहे. संबंधित गाणे वगळून चित्रपट प्रदर्शनाला न्यायालयाने परवानगी दिली आहे.   "अग्निपथ' चित्रपटातील "तेरी मेरी कहानी अधुरी...

Tuesday, January 24, 2012 AT 08:59 PM (IST)

पेडणे, ता. 18 - पोरस्कडे येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 वर (माऊली मंदिराजवळ) आज संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलची धडक बसून झालेल्या अपघातात अनंत बाळा हळदणकर (60 वर्षे) पादचारी ठार झाला, तर किशोर मोहन जाधव (26 वर्षे) मडुरा-बांदा (सिंधुदुर्ग) व पांडुरंग वामन महाले (37 वर्षे) हे मोटारसायकलस्वार व मागे बसलेला हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

Wednesday, January 18, 2012 AT 11:38 PM (IST)

पणजी, ता. 18- ज्येष्ठ संगीतकार अँथनी गोन्साल्विस (85 वर्षे) यांचे आज सायंकाळी उशिरा माजोर्डा येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचे पुत्र विदेशातून येथे पोचल्यावर त्याचा निर्णय घेतला जाणार आहे. बॉलीवूडमध्ये ऑर्केस्ट्रा ही संकल्पना सुरवातीला गोन्साल्विस यांनी आणली होती. त्याचमुळे लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल त्यांना गुरुस्थानी मानत. एस. डी. बर्मन यांच्यासोबतही गोन्साल्विस यांनी काम केले होते.

Wednesday, January 18, 2012 AT 11:37 PM (IST)

व्यंगचित्र -  अभिजीत घुले ----------------------------------------------------------------------------------- व्यंगचित्र -  बापू घावरे ----------------------------------------------------------------------------------- व्यंगचित्र -  अजय बारी ----------------------------------------------------------------------------------- व्यंगचित्र -  खलिल खान ----------------------------------------------------------- ...

Sunday, January 08, 2012 AT 09:08 PM (IST)

मुंबई, 28 - सहारा वन वाहिनीवर लवकरच सुरू होणारा "सूर क्षेत्र" हा कार्यक्रम वादग्रस्त ठरण्याची शक्‍यता आहे. या संगीताच्या कार्यक्रमात पाकिस्तानी गायकांना सहभागी करून घेतले जाणार आहे. शिवसेनेच्या चित्रपट सेनेने कोणत्याही पाकिस्तानी कलाकाराला कार्यक्रमात अथवा चित्रपटात सहभागी करून घेण्यास विरोध असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे हा कार्यक्रम कितपत सुरळीत होतोय याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.

Wednesday, December 28, 2011 AT 08:42 PM (IST)

पणजी, ता. 19 - "चुपके चुपके रात-दिन आसू बहाना याद है' ही रसिकांनी फर्माईश केलेली अत्यंत लोकप्रिय गझल गाऊन गझलसम्राट गुलाम अली यांनी आज मैफलीत रंग भरला. गोवा मुक्तिदिन सुवर्णमहोत्सवानिमित्त आज रात्री कांपाल मैदानावर गुलाम अली यांची गझल ऐकण्यासाठी रसिकांनी गर्दी केली होती. खुर्च्या रिकाम्या नसल्याने काही रसिकांनी रेड कार्पेटवर बसून गझलांचा आनंद लुटला. कार्यक्रमाच्या सुरवातीला त्यांनी गोवा मुक्तिदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

Monday, December 19, 2011 AT 11:20 PM (IST)

पणजी, ता. 15 (प्रतिनिधी) ः "अल्ला के बंदे' आणि अन्य एकापेक्षा एक सुरेल गाण्यांचा, सुफी संगीताचा नजराणा सादर करून आज प्रसिद्ध सुफी गायक कैलास खेर यांनी येथील कांपाल मैदानावर रसिकांना खुर्चीला खिळवून ठेवले. गोवा मुक्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या संगीताच्या मैफलींच्या कार्यक्रमांना आज प्रारंभ झाला. संध्याकाळी साडेआठच्या दरम्यान सुरू झालेला श्री.

Friday, December 16, 2011 AT 01:12 AM (IST)

मुंबई - 'पप्पू कान्ट डान्स साला' या चित्रपटाच्या प्रसिध्दी कार्यक्रमात अभिनेत्री नेहा धूपीया ही येथे उपस्थित होती.

Wednesday, December 14, 2011 AT 06:15 PM (IST)

पणजी, ता. 2   ः इफ्फीत सुधारणांचे पर्व सुरू झाले असून, स्वतःहून महोत्सवात चित्रपट दाखवण्यासाठी संपर्क साधणाऱ्यांची संख्या वाढते म्हणजे इफ्फीचा दर्जा वाढतो आहे व तसे संदेश जगाच्या पाठीवर जात आहेत. ग्लॅमर आले नाही तरी सृजन येथे येत आहेत, असा दावा प्रसिद्धी निर्माते विधू विनोद चोप्रा यांनी आज येथे केला.  श्री.

Saturday, December 03, 2011 AT 12:29 AM (IST)

पणजी, ता. 1 ः भारतातील बालकांना ग्रासणारी गरिबी या विषयावरील "अनादर प्लॅनेट' या विषयावरील ब्रिटनमधील निर्माते जॅमी नटगेन्स यांच्या लघुपटाला इफ्फीतील शॉर्ट फिल्म सेंटरचा सोनेरी दिव्याचे पहिले बक्षीस मिळाले. स्मिता भिडे यांनी हा लघुपट दिग्दर्शित केला असून आंतरराष्ट्रीय स्पर्धा वर्गवारीत त्यांचा चित्रपट अव्वल ठरला.  गोवा मनोरंजन सोसायटीने आयोजित केलेल्या या स्पर्धेचे परीक्षण दिग्दर्शक बासू चटर्जी यांच्या नेतृत्वाखालील परीक्षक मंडळाने केले.

Friday, December 02, 2011 AT 02:00 AM (IST)

पणजी, ता. 1   ः संपूर्ण पूर्वांचलमध्ये हिंदी सिनेमावर बंदी आहे. थिएटर्सही फार कमी आहेत. परंतु गेल्या वर्षी मी इफ्फीत प्रतिनिधी म्हणून आलो आणि यंदा माझा चित्रपट इंडियन पॅनोरमातून देश विदेशी प्रतिनिधी पाहात आहेत. गोवा इफ्फीने खूप समाधान दिले आणि व्यासपीठही मिळाले. मणिपुरी चित्रपट "फी जिगी मणी' या चित्रपटाचे दिग्दर्शक ओ गौतम सिंग यांचे हे भावपूर्ण उद्‌गार आहेत.

Friday, December 02, 2011 AT 01:45 AM (IST)

 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: