Last Update:
 
क्रीडा

पणजी, ता. 7 - सामना संपण्यास 18 मिनिटे बाकी असताना भारताचा राष्ट्रीय कर्णधार सुनील छेत्री याने केलेला गोल गोव्याच्या चर्चिल ब्रदर्ससाठी मंगळवारी संध्याकाळी मौल्यवान ठरला. या गोलच्या बळावर त्यांनी कोलकत्याच्या मोहन बागानला 1-1 असे गोलबरोबरीत रोखले. बरोबरीच्या एका गुणामुळे स्पर्धेची एक फेरी बाकी असताना चर्चिल ब्रदर्सचे सहाव्या आय-लीग फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद निश्‍चित झाले. दुसऱ्यांदा दक्षिण गोव्यातील हा संघ भारताचा "चॅंपियन क्‍लब' बनला.

Wednesday, May 08, 2013 AT 03:00 AM (IST)

इंदूर - गोलंदाजांच्या भरावी कामगिरीच्या जोरावर गुजरातने टी-20 क्रिकेट स्पर्धा जिंकून सईद मुश्‍ताक अली करंडक पटकाविला. अंतिम फेरीच्या लढतीत त्यांनी पंजाबचा सहा गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबला गुजरातच्या मेहुल पटेल, जसप्रीत बुमराह आणि रोहित दहिया यांच्या गोलंदाजीसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात अपयश आले. पंजाबची स्थिती एकवेळ 4 बाद 20 अशी होती.

Monday, April 01, 2013 AT 12:16 AM (IST)

रियाध, ता. 31 ः सौदी अरेबियामध्ये पहिल्यांदाच महिलांच्या स्पोर्टस्‌ क्‍लबला परवाना देण्यात आल्याचे वृत्त आहे. धार्मिक पगडा असलेल्या सौदी अरेबियामध्ये हा निर्णय महत्त्वाचे पाऊल मानले जाते. आतापर्यंत महिलांच्या व्यायामाची ठिकाणे, जिम यांना "आरोग्य केंद्र' या नावाखाली आरोग्य मंत्रालयाचा परवाना घेणे आवश्‍यक होते.

Monday, April 01, 2013 AT 12:14 AM (IST)

कल्याणी, ता. 31 ः कोलकत्याच्या मोहन बागाने देखील गतविजेत्या धेंपो स्पोर्टस क्‍लबवर मात केली. रविवारी झालेल्या सामन्यात त्यांनी 2-1 असा विजय मिळविला. या विजयाने बागानला आय-लिग स्पर्धेच्या अव्वल गटातून होणारी संभाव्य गंच्छती टाळण्याच्या मोहिमेला बळ मिळाले. बागानच्या पंधराव्या फेरीतील सामन्यात सईद रहिम नाबी याने सातव्याच मिनिटाला संघाचे घाते उघडले. सामन्याच्या सुरवातीलाच त्यांनी आघाडी मिळवून प्रस्पिर्ध्यांवर दडपण आणले.

Monday, April 01, 2013 AT 12:09 AM (IST)

पेडणे, ता. 31 (प्रतिनिधी) ः ध्रुव स्पोटर्स ऍण्ड कल्चरल क्‍लब पार्सेने मुरमुसे तुये मैदानावर आयोजित केलेल्या अखिल गोवा व सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित झेड पी चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत मुरगांव संघाने यजमान पेडणे संघावर 50 धावानी पराभव करून स्पर्धेतील अजिंक्‍य पद मिळविले. विजेत्या मुरगाव संघाला रोख 50,000 रुपये व झेड. पी. चषक प्राप्त झाला. उपविजेत्या पेडणे संघाला रोख 30,000 रुपये व चषकावर समाधान मानावे लागले.

Monday, April 01, 2013 AT 12:08 AM (IST)

बॅसल - भारताची अव्वल बॅडमिंटनपटू साईना नेहवाल हिची स्विस ओपन स्पर्धेतील घोडदौड चीनची शिझीयन वँगने रोखली. शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात शिझीयनने साईनचा २१-११, १०-२१, २१-९ असा तीन गेममध्ये पराभव केला. साईनाला या स्पर्धेत विजेतेपदाच्या हॅटट्रिकची संधी होती. तसेच या स्पर्धेत अग्रमानांकन असलेल्या साईनाने उपांत्यपूर्व फेरीत सहाव्या मानांकित प्रतिस्पर्ध्यावर 29 मिनिटांतच विजय मिळविला होता.

Sunday, March 17, 2013 AT 07:59 PM (IST)

मोहाली - मोहाली कसोटी सामन्यात आज (रविवार) चौथ्या दिवशी शिखर धवनला द्विशतक पूर्ण करण्यात अपयश आले असले तरी मुरली विजयने कसोटी कारकिर्दीतील तिसरे शतक झळकाविले आहे. त्यानंतर आलेल्या भारतीय फलंदाजांना मात्र मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारताचा पहिला डाव 499 धावांवर संपुष्टात आला. भारताने ऑस्ट्रेलियावर 91 धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने 3 बाद 75 धावा केल्या आहेत.

Sunday, March 17, 2013 AT 07:58 PM (IST)

सिडनी, ता. 12 ः शिस्तभंगाच्या कारवाई प्रकरणी संघातून वगळण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार शेन वॉटसन याने मायदेशी परतताच विमानतळावर आपण चुकल्याची कबुली दिली. मात्र, त्यासाठी झालेली शिक्षा खुपच कठोर असल्याचे देखील त्याने सांगितले.  भारतातील एकूण कारवाई संदर्भात बोलताना वॉटसन म्हणाला,""प्रशिक्षकांनी अपयशाची कारणमीमांसा करण्यास सांगितल्यानंतरही मी चालढकल केली. मी शंभर टक्के चूक आहे.

Wednesday, March 13, 2013 AT 12:53 AM (IST)

नवी दिल्ली - खेळाडूंमधील वादामुळे लंडन ऑलिंपिकमध्ये भारताकडून टेनिसमध्ये दुहेरीत दोन संघ खेळविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे, अखिल भारतीय टेनिस महासंघटनेचे (एआयटीए) अध्यक्ष अनिल खन्ना यांनी स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपासून महेश भूपती आणि लिअँडर पेस यांच्यातील वादामुळे दुहेरीत नक्की कोण खेळणार याबाबत जोरदार चर्चा सुरु होती. अखेर यावर आज (गुरुवार) पडदा पडला.

Thursday, June 21, 2012 AT 11:44 PM (IST)

हेयांग (चीन), ता. 21 ः तिसऱ्या आशियाई बीच क्रीडा स्पर्धेत कबड्डीत पुरुष विभागात भारताच्या वर्चस्वाला धक्का बसला. गुरुवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत भारताला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून पराभवाला सामोरे जावे लागले. दुसरीकडे महिलांनी साखळीत सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. सुवर्णपदकाच्या लढतीत उद्या त्यांची गाठ थायलंडशी पडेल. भारतीय पुरुष संघासाठी आजचा दिवस अपयशाचाच ठरला.

Thursday, June 21, 2012 AT 11:43 PM (IST)

नवी दिल्ली, ता. 21 (पीटीआय) ः ऑलिंपिक स्पर्धेत भारताची कोणती टेनिस जोडी खेळणार, हे अजून निश्‍चित होत नसल्यामुळे भारतीय ऑलिंपिक संघटनेने (आयओए) टेनिसपटूंवर टीका केली आहे. "आयओए'चे हंगामी अध्यक्ष विजयकुमार मल्होत्रा यांनी टीका करताना कुणाचे नाव घेतले नसले, तरी त्यांचा सगळा रोख महेश भूपती आणि रोहन बोपण्णा यांच्याकडे होता.

Thursday, June 21, 2012 AT 11:42 PM (IST)

कझान (रशिया), ता. 21 ः भारताची ग्रॅंड मास्टर कोनेरू हंपी हिने कझान महिला ग्रांप्री बुद्धिबळ स्पर्धेतील आपली आगेकूच कायम राखत अन्य दोन खेळाडूंसह संयुक्त आघाडी मिळविली आहे. नवव्या फेरीत तिने महिलांच्या ब्लिट्‌झ प्रकारातील विश्‍वविजेती युक्रेनची केटेरिना लान्हो हिच्यावर मात केली. कोनेरू, अर्मेनियाची एलिना डॅनिलियान आणि स्लोवेनियाची ऍना मुझिचिक या तिघी सहा गुणांसह संयुक्तरीत्या आघाडीवर आहेत.

Thursday, June 21, 2012 AT 11:42 PM (IST)

हेयांग (चीन), ता. 20 ः भारताने येथे सुरू असलेल्या बीच क्रीडा स्पर्धेत कबड्डीत आपली आगेकूच कायम राखली. दुसऱ्या साखळी सामन्यातही भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी सहज विजय मिळविला. भारताच्या महिला संघाने बांगलादेशाचा 50-28 असा सहज पराभव केला. पूर्वार्धात भारताने तुफानी खेळ करत 27-16 अशी आघाडी घेतली होती. तीच निर्णायक ठरली. पाठोपाठ पुरुष संघाने कोरियाचा 40-25 असा पराभव केला. पूर्वार्धात भारताने 24-10 अशी आघाडी घेतली होती.

Thursday, June 21, 2012 AT 12:35 AM (IST)

लंडन, ता. 20 ः पाच वेळची विजेती व्हिनस विल्यम्स आणि माजी विजेती किम क्‍लायस्टर्स यांना यंदाच्या वर्षी विंबल्डन स्पर्धेत मानांकन देण्यात आलेले नाही. गेल्या दहा वर्षांचा इतिहास बघता या दोघी खेळाडू प्रथमच स्पर्धेत बिगरमानांकित म्हणून खेळणार आहेत. येत्या सोमवारपासून (ता. 25) सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी बुधवारी मानांकने जाहीर करण्यात आली.

Thursday, June 21, 2012 AT 12:35 AM (IST)

नवी दिल्ली, ता. 20 ः ऑलिंपिकमध्ये माझा दुहेरीचा सहकारी म्हणून महेश भूपती किंवा रोहन बोपण्णा खेळणार नसतील, तर मी ऑलिंपिकमध्ये खेळतच नाही. अन्य कोणत्याही दुय्यम सहकाऱ्याच्या साथीत खेळण्याची माझी तयारी नाही, अशी आक्रमक भूमिका लिअँडर पेसने घेतली आहे.

Thursday, June 21, 2012 AT 12:34 AM (IST)

लंडन, ता. 18 ः सरे कौंटी क्‍लबचा क्रिकेटपटू टॉम मेनार्डचे अपघाती निधन झाले. तो 23 वर्षांचा होता. त्याच्या निधनामुळे सरे क्‍लबने बुधवारी होणारी आपली टी 20 लढत खेळण्यास नकार दिला आहे. मात्र, इंग्लंड क्रिकेट मंडळाने वेस्ट इंडीजविरुद्धचा सामना नियोजित वेळेप्रमाणेच होईल, असे स्पष्ट केले आहे. विंबल्डन पार्कजवळील रेल्वे स्टेशनवर सोमवारी पहाटे त्याचा मृतदेह सापडल्याचे लंडन शहर पोलिसांनी म्हटले आहे. सरे क्‍लबनेदेखील या वृत्तास दुजोरा दिला.

Monday, June 18, 2012 AT 10:37 PM (IST)

सेंट ल्युसिया, ता. 18 ः सलामीचा फलंदाज किएरॉन पॉवेलच्या शानदार शतकाच्या जोरावर वेस्ट इंडीज अ संघाने तिसऱ्या अनधिकृत कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय अ संघावर 90 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा वेस्ट इंडीजच्या पहिल्या डावात 8 बाद 320 धावा झाल्या होत्या. मॅक्‌लिन 10, तर जॉन्सन 4 धावांवर खेळत होता. पहिल्या डावातील फलंदाजीप्रमाणे भारताची गोलंदाजीदेखील ढेपाळली.

Monday, June 18, 2012 AT 10:36 PM (IST)

नवी दिल्ली, ता. 18 ः लिअँडर पेस आणि महेश भूपती एकमेकांसह खेळण्यास तयार नाहीत, मग त्यांना एकत्र खेळविण्याचा अट्टहास कशाला, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत ऑलिंपिकसाठी दोन जोड्यांची निवड करण्याची सूचना सोमवारी केंद्रीय क्रीडा खात्याने अखिल भारतीय टेनिस संघटनेस केली आहे. एवढेच नव्हे, तर या संदर्भात अंतिम निर्णय उद्या दुपारपर्यंत घेण्याचा आदेशही संघटनेस देण्यात आला आहे.

Monday, June 18, 2012 AT 10:36 PM (IST)

- वृत्तसंस्था खार्किव - युरो अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत रविवारी रात्री 'ब' गटातील संघांमध्ये साखळीतील सामन्यांत जर्मनी आणि पोर्तुगाल संघांनी विजय मिळवीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पोर्तुगालने बलाढ्य नेदरलँडचा २-१ असा पराभव केला. तर जर्मनीनेही डेन्मार्कचा २-१ असा पराभव केला. पोर्तुगालच्या विजयात हिरो ठरला तो ख्रिस्तियानो रोनाल्डो. त्याने पोर्तुगालसाठी दोन गोल केले.

Monday, June 18, 2012 AT 10:35 PM (IST)

नवी दिल्ली - भारतीय टेनिसमध्ये दुहेरीच्या संघावरून सुरु असलेल्या वादात आता आणखी भर पडली आहे. भारतीय टेनिसपटू रोहन बोपण्णा याने आगामी लंडन ऑलिंपिक स्पर्धेत लिअँडर पेसबरोबर खेळण्यास नकार दिला आहे. अखिल भारतीय टेनिस संघटनेने रविवारी पेस बरोबर खेळण्यास नकार देणाऱ्या महेश भूपतीशी अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. एका वृत्तवाहिनीशी बोलताना बोपण्णाने आपण पेसबरोबर खेळण्यास तयार नसल्याचे सांगितले.

Monday, June 18, 2012 AT 10:34 PM (IST)

पणजी, ता. 7 - गोव् याची माजी जागतिक विजेती इव्हाना फुर्तादो हिने आशियायी ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम गुरुवारी केला. उझबेकिस्तानमधील ताश्‍कंद येथे झालेल्या या स्पर्धेत तेरा वर्षीय इव्हानाने अपराजित कामगिरी करताना 9 फेऱ्यांतून सर्वाधिक 7.5 गुण प्राप्त केले. विश्‍वनाथन आनंदच्या पाचव्या जगज्जेतेपदाची आठवण ताजी असतानाच इव्हानाने भारतीय बुद्धिबळात विजेतेपदाला गवसणी घातली आहे.

Friday, June 08, 2012 AT 04:00 AM (IST)

पणजी, ता. 29   ः गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) अध्यक्षांना सध्या आजीवन अध्यक्षपद भूषविण्याची मुभा आहे, मात्र त्यात बदल करून अध्यक्षाला फक्त दोनच "टर्म' पद भूषवायला मिळणार आहे. यासंबंधी जीसीए घटनेत बदल करणार असून आमसभेचीही मान्यता मिळविणार आहे. ही माहिती जीसीएचे अध्यक्ष विनोद फडके यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

Wednesday, May 30, 2012 AT 04:00 AM (IST)

पणजी, ता. 29   ः गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) अध्यक्षांना सध्या आजीवन अध्यक्षपद भूषविण्याची मुभा आहे, मात्र त्यात बदल करून अध्यक्षाला फक्त दोनच "टर्म' पद भूषवायला मिळणार आहे. यासंबंधी जीसीए घटनेत बदल करणार असून आमसभेचीही मान्यता मिळविणार आहे. ही माहिती जीसीएचे अध्यक्ष विनोद फडके यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

Wednesday, May 30, 2012 AT 04:00 AM (IST)

पणजी, ता. 29   ः गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) अध्यक्षांना सध्या आजीवन अध्यक्षपद भूषविण्याची मुभा आहे, मात्र त्यात बदल करून अध्यक्षाला फक्त दोनच "टर्म' पद भूषवायला मिळणार आहे. यासंबंधी जीसीए घटनेत बदल करणार असून आमसभेचीही मान्यता मिळविणार आहे. ही माहिती जीसीएचे अध्यक्ष विनोद फडके यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

Wednesday, May 30, 2012 AT 04:00 AM (IST)

पणजी, ता. 14 ः गोव्याने तीन वर्षांपूर्वी संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा पाचव्यांदा जिंकली होती, त्यानंतर पदरी अपयशच आले. यंदा गोव्याच्या युवा संघाने ओडिशात होणारी स्पर्धा जिंकून पुन्हा एकदा देशात सर्वोत्तम ठरण्याचे लक्ष्य बाळगले आहे. ""राज्याला आम्ही करंडक देण्याचा निश्‍चय केला आहे,'' असा आत्मविश्‍वास संघाचे प्रशिक्षक मॅथ्यू डिकॉस्टा यांनी सोमवारी व्यक्त केला.

Tuesday, May 15, 2012 AT 01:00 AM (IST)

 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: