Last Update:
 
गोमन्तक विशेष

यंदा एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच राज्यात उन्हाळा तीव्र होऊ लागला आहे. खाणबंदीमुळे खाणग्रस्त भागातले हवा प्रदूषण कमी होऊ लागले तरी खाणीमुळे तडाखा बसलेल्या नदी, नाले, शेतीतील गाळ न उपसल्याचा फटका नागरिकांना बसत आहे. युद्ध पातळीवर खाणग्रस्त भागातील नद्या, नाले, शेतीची प्राथमिक साफसफाई हाती घ्यावी लागेल अन्यथा पावसात खाणग्रस्त व आसपासच्या भागात पूर आलेले दिसतील, डंप्सच्या ठिकाणी वातावरण काय आहे त्याचा आढावा घ्यावा लागेल.

Friday, April 12, 2013 AT 11:53 PM (IST)

सिंधुदुर्ग, कारवार, बेळगावात पडसाद बैठका सुरू, उग्र आंदोलनाची शक्‍यता पणजी, ता. 7 (प्रतिनिधी) : राज्य सरकार गोव्याबाहेर नोंद झालेल्या वाहनांना प्रवेश कर लागू करणार आहे. याच्याविरोधात आता सिंधुदुर्ग, कारवार आणि बेळगाव जिल्ह्यांत आतापासूनच पडसाद उमटणे सुरू झाले आहे. सध्या बैठका आणि निवेदने देणे या पातळीवर हे पडसाद असले तरी 15 एप्रिलनंतर यातून उग्र आंदोलन उभे राहण्याची शक्‍यता आहे. हे तिन्ही जिल्हे गोव्याशी संलग्न आहेत.

Monday, April 08, 2013 AT 01:31 AM (IST)

पणजी, ता. 4 (प्रतिनिधी) ः राज्यातील 268 शाळांत 15 पैकी कमी विद्यार्थी आहेत. जननदरच घटला आहे. तो 2.10 असणे स्वाभाविक असताना 1.7 पर्यंत खाली आला आहे. त्यामुळे हेच चित्र कायम राहिल्यास 15 वर्षांनी (2028 मध्ये) राज्यात ज्येष्ठ नागरिकांचीच संख्या लहान मुलांपेक्षा जास्त असेल, अशी भीती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत व्यक्त केली.

Thursday, April 04, 2013 AT 11:03 PM (IST)

मडगाव, ता. 4 (वार्ताहर) ः मडगाव शिमगोत्सव समितीतर्फे 26व्या वार्षिक शिमगोत्सवाची वसंत शिरोडकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरवात करण्यात आली. यावेळी मडगावचे आमदार दिगंबर कामत प्रमुख पाहुणे तर विजय सरदेसाई, आलेक्‍स रेजिनाल्ड, मनोहर आजगावकर सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच आर्थूर डिसिल्वा, उषा सरदेसाई, गिरीश चोडणकर, प्रतिमा कुतिन्हो, बॅटा कार्दोजो, सदानंद नाईक, दामोदर शिरोडकर व समितीचे पदाधिकारी उपस्थित होते .

Thursday, April 04, 2013 AT 11:02 PM (IST)

वाळपई, ता. 4 (प्रतिनिधी) ः गोवा राज्य पर्यटन खाते व सत्तरी शिमगोत्सव समितीतर्फे आयोजित "लोकोत्सव 2013' उत्साहात साजरा करण्यात आला. लोकनृत्य, रोमटामेळ, चित्ररथ, वेशभूषा स्पर्धा या लोकोत्सवात सादर करण्यात आले. सत्तरी तालुक्‍यातील लोकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी तालुका पातळीवर देखील वरील स्पर्धा भरविली होती. घुमचे कटर घुम. ओस्यय ओस्ययच्या गजराने वाळपई नगरी दणाणली.

Thursday, April 04, 2013 AT 11:01 PM (IST)

वास्को, ता. 1 (प्रतिनिधी) ः गोवा पर्यटन खात्याच्या सहकार्याने मुरगाव नागरिक शिमगोत्सव समितीने आयोजित केलेल्या चित्ररथ मिरवणुकीतील पौराणिक कथांवर आधारित असलेल्या चित्ररथांनी व पारंपरिक रोमटामेळ पथकांनी वास्कोवासियांच्या ह्रदयांचा ठाव घेतला. स्वातंत्र्यपथ मार्गावरून निघालेल्या या मिरवणुकीने वास्कोवासियांनी सुमारे तीन जाग्यावर खिळून ठेवले. पुरुष रोमटामेळ पथकांसह महिला पथकेही या मिरवणुकीत सामील झाली होती.

Monday, April 01, 2013 AT 10:55 PM (IST)

म्हापसा, ता. 1 (प्रतिनिधी) ः म्हापसा शिमगोत्सव समिती व पर्यटन खाते यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 35 व्या वर्षातील चित्ररथ स्पर्धेत 60 हजार रुपये, कै. रामकृष्ण शेट नार्वेकर ढाल व म्हापसा नगरपालिका चषक असे पहिले बक्षीस कुंभारजुवे नागरिक समितीला, तर रोमटामेळ स्पर्धेत 35 हजार रुपये व गजानन पानकर ढाल असले पहिले बक्षीस सावर्डे शिमगोत्सव मंडळाला प्राप्त झाले. लोकनृत्य स्पर्धेचे पहिले 20 हजाराचे बक्षीस सारस्वत कला मंडळ, कुर्टी-फोंडा मिळवले.

Monday, April 01, 2013 AT 10:58 PM (IST)

गोमन्तक विशेष पणजी, ता. 3 - राज्यातील पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या दृष्टीने नद्यांवर पूल बांधण्यासाठी आता व्यापक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्याशिवाय रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी पणजीतून जलमार्गाने इतर ठिकाणी जाण्यासाठी प्रवासी लॉंचसेवा सुरू करण्याचा विचारही सरकारने सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिनेक मोठे पूल बांधण्याची तयारी सरकार येत्या आर्थिक वर्षात करणार आहे.

Monday, March 04, 2013 AT 01:27 AM (IST)

पणजी, ता. 17 - बसस्थानके म्हणजे गावांची, शहराची प्रवेशद्वारे..! या बसस्थानकाच्या स्थितीवरून प्रवाशांना त्या गाव, शहराचा, राज्याचा अंदाज येतो. गोव्यातील कदंब महामंडळाच्या चौदा बसस्थानकांच्या बाबतीतही तसेच म्हणता येईल.

Monday, February 18, 2013 AT 01:22 AM (IST)

पर्ये, ता. 12 - एकाच प्रकारच्या विषारी सापात असलेल्या विषाच्या मात्रेत प्रदेशानुसार बदल होत असतो, असे आपल्या अभ्यासात आढळून आले असल्याचे जगप्रसिद्ध सर्पतज्ज्ञ रोमुलस व्हिटकर यांनी सांगितले. व्हिटकर आणि वन्यजीव अभ्यासक जेरी मार्टिन्स यांनी हल्लीच गोव्यातल्या म्हादई, नेत्रावळी आणि महावीर अभयारण्यात सापाच्या विषा संदर्भातील संशोधन करण्यासाठी भेट दिली.

Tuesday, June 12, 2012 AT 11:34 PM (IST)

पणजी, ता. 10 - गोवा क्रिकेट असोसिएशनमधील (जीसीए) कथित भ्रष्टाचाराची चौकशी करणारे चेतन देसाई जीसीएच्या व्यवस्थापकीय समितीचे सदस्य असेपर्यंत सारा कारभार पारदर्शक होता आणि ते जीसीएतून जाताच भ्रष्टाचार माजला का, असा खडा सवाल जीसीएचे अध्यक्ष ऍड. दयानंद नार्वेकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. जीसीएची निवडणूक जाहीर झाली असून, त्या अनुषंगाने संलग्न क्‍लबांवर दबाव टाकण्याचा देसाई यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

Friday, May 11, 2012 AT 03:45 AM (IST)

पर्ये, ता. 10 - 4 दशके, म्हणजे 40 वर्षे हे लोक येथे राहतात... इथल्या वातावरणाशी ते जणू एकरूपच झाले आहेत... त्यांचे जीवन तसे हलाखीचेही आणि समस्यांनी वेढलेले... मात्र आपल्या राजकारण्यांना मात्र केवळ निवडणुकीपुरतीच त्यांची व त्यांच्या 40 मतांची आठवण येते केरीतील हणजुणे धरणाच्या परिसरात वास्तव्यात असलेल्या 18 तमीळ कुटुंबांची ही व्यथा आहे. येथे एकवस्ती करून हे लोक राहतात. मात्र एरवी कोण त्यांच्याकडे फिरकत नाही. अपवाद फक्‍त निवडणुकांचा.

Friday, May 11, 2012 AT 03:30 AM (IST)

पणजी, ता. 10 - सागर सुरक्षा कवच या नावाखाली तटरक्षक दल, सागरी पोलिस दल आणि पोलिस दलाने आज दुसऱ्या दिवशीही सराव केला. पण, सरावादरम्यान प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्याच्या प्रयत्नात मोठी वाहतूक कोंडी मात्र निर्माण झाली. गोव्यात समुद्रमार्गे घातपाती कृत्य करणारे शिरू शकतात, असे अंदाज यापूर्वी गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केले होते. त्याचाच आधार घेत सुरक्षा यंत्रणांचा तयारीचा आढावा घेण्यासाठी नियमित स्वरूपात ही चाचणी घेण्यात येते.

Friday, May 11, 2012 AT 02:15 AM (IST)

पणजी, ता. 6 - चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने गेल्या 24 तासांत समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याचे दिसून आले. मुरगाव तालुका वगळता इतरत्र भरतीचे पाणी सरासरीपेक्षा मीटर ते दीड मीटरने पुढे आलेले दिसून आले. या काळात कोणतीही अनुचित घटना घडू म्हणून किनारी भागात आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. आज दिवसभरात उत्साही पर्यटकांना समुद्रात खोलवर जाण्यापासून जीवरक्षकांनी रोखले. काल (शनिवार) रात्रभर चंद्र समीपदा काळात पाण्याची पातळी वाढत होती.

Monday, May 07, 2012 AT 04:15 AM (IST)

प णजी, ता. 6 - पुरातत्त्व विद्या शाखेचा प्राध्यापक कुठेतरी वाचलेल्या माहितीच्या आधारे जंगलात खोलवरची गुहा शोधतो. त्या गुहेत अथक प्रयत्नानंतर 28 वर्षांनी खोदकाम करणे त्याला शक्‍य होते आणि त्याला ती गुहा अलिबाबाची गुहाच असल्याचे समजते. भारतातील सर्वांत पहिली वस्ती त्या भागात झाली असावी, अशा समजाला पुष्टी देणारे पुरावे त्याच्या हाती लागतात. ही काही चित्रपटातील कथा नव्हे.

Monday, May 07, 2012 AT 04:00 AM (IST)

पणजी, ता. 4 ः पिण्यासाठी पाणी शुद्ध करणारे साधे उपकरण विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे विजेवर चालणारी उपकरणे वा पाणी उकळून पिण्याची गरज भासणार नाही. केवळ सौर ऊर्जेवर हे आता विकसित केलेले उपकरण चालते. चौघांच्या कुटुंबासाठी याची निर्मितीही थोडक्‍या पैशात, म्हणजे फक्त एकदाच सातशे रुपये खर्च करून कायमस्वरूपी करता येते.  सध्या पर्वरी येथे वास्तव्यास असलेल्या डॉ. प्रमोद पाठक यांनी दोन वर्षांच्या संशोधनानंतर हे उपकरण विकसित केले आहे.

Saturday, May 05, 2012 AT 04:00 AM (IST)

पणजी, ता. 1ः गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर 4, 5, 6 मे रोजी जाताना सावधान. या तिन्ही दिवसात समुद्राला सर्वांत मोठी भरती येणार आहे. ही भरती साधीसुधी नसेल... ती वर्षभरातीलच नव्हे, तर शतकातील सर्वांत मोठी असण्याची शक्‍यता आहे. यावेळी चार मीटरहून जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्‍यता आहे. यापूर्वी उधाणावेळी साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळल्याची नोंद आहे. चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने या लाटा उसळणार आहेत.

Wednesday, May 02, 2012 AT 05:30 AM (IST)

पणजी, ता. 1- बाहेरून कलिंगड पिवळे झाले म्हणजे ते बाद ठरले... हा आजवरचा समज आता काढून टाकावा लागणार आहे. काळपट आणि टरबुजांच्या रंगाच्या कलिंगडांच्या जोडीला आता पिवळी कलिंगडे उपलब्ध होणार आहेत. यंदा प्रायोगिक तत्त्वावर सांगोल्डा येथे पिवळ्या कलिंगडाचे यशस्वी उत्पादन घेण्यात आले आहे. बाहेरून पिवळे पण आतून लालभडक असे हे कलिंगड लागतेही रुचकर! जुनेगोवे येथील कृषी विज्ञान केंद्रातील डॉ. एच. आर.

Wednesday, May 02, 2012 AT 05:15 AM (IST)

मडगाव, ता. 30 : आंबा हा फळांचा राजा. आंबा आवडत नाही, अशी माणसे बहुधा खूपच शोधल्यावर सापडतील. दिवाळीच्या सुमारास म्हणजे साधारण नोव्हेंबर महिन्यात आम्रवृक्षाला मोहर येतो. आंब्याचं पानन्‌पान मोहराने बहरते. सुरवातीला कैऱ्या, नंतर पिकलेले आंबे बाजारपेठेत येतात. हवामान अनुकूल राहिले, तरच आंबापीक पुष्कळ मिळते. डिसेंबरनंतर हवामान दूषित बनले, तर आंबापीक धोक्‍यात येते.

Monday, April 30, 2012 AT 10:11 PM (IST)

पणजी, ता. 29 ः "कौन है ये दयानंद बांदोडकर...'! मिरामार येथील समुद्र किनाऱ्यावर असलेल्या गोव्याचे भाग्यविधाते आणि पहिले मुख्यमंत्री दयानंद बाळकृष्ण बांदोडकर यांच्या कुलूपबंद समाधिस्थळाकडे कुतूहलाने पाहिल्यानंतर आत बसवलेल्या नामफलकावरील भाऊंचे नाव वाचून पर्यटक विचारतात, तेव्हा धक्काच बसतो.

Monday, April 30, 2012 AT 02:00 AM (IST)

पणजी, ता. 25 (प्रतिनिधी) ः राज्यातील पंचायत निवडणुकीसाठी तीन दिवसांत 2355 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत सादर करण्यात आलेल्या अर्जात सासष्टी तालुका आघाडीवर असून सासष्टीतील सर्व पंचायतींतून मिळून एकूण 525 उमेदवारी अर्ज आले आहेत. पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशीही राज्यातील बाराही तालुक्‍यातून उमेदवारांचा उत्साह कायम दिसला. तिसऱ्या दिवशी 934 उमेदवारी अर्ज विविध तालुक्‍यातून दाखल झाले आहेत.

Thursday, April 26, 2012 AT 12:00 AM (IST)

काणकोण, ता. 25 (प्रतिनिधी)- कोकण रेल्वेच्या लोलये रेल्वे स्टेशनजवळ आज (25) सकाळी कारवार - मडगाव पॅसेंजर रेल्वेगाडी बंद पडल्याच्या निषेधार्थ या रेल्वेगाडीने गोव्याच्या वेगवेगळ्या भागात नोकरीनिमित्त येणाऱ्या प्रवाशांनी संतप्त होऊन रेल्वे रुळावर ठिय्या देऊन रेल्वे वाहतूक बंद पाडली. काणकोण पोलिसांनी रेल्वे वाहतूक अडवून ठेवल्याच्या प्रकरणात तीन व्यक्तींना ताब्यात घेऊन त्याची नंतर जामिनावर सुटका केली. सकाळी 6 वाजता ही गाडी कारवार येथून सुटते व 6.

Thursday, April 26, 2012 AT 12:00 AM (IST)

मडगाव, ता. 25 (प्रतिनिधी)- दाबोळीचा विमानतळ सुखरूप ठेवण्याबरोबर विस्तारीकरण करणे दिवंगत पर्यटनमंत्री माथानी साल्ढाना यांचे स्वप्न होते. आता श्रीमती एलिना साल्ढाना यांनी दाबोळी विमानतळाबद्दल आपली भूमिका स्पष्ट करावी, कुठ्ठाळीच्या पोटनिवडणुकीत युगोडेपा त्यांना पूर्ण पाठिंबा देण्यास तयार असल्याचे सरचिटणीस ऍड. आनाक्‍लेत व्हिएगश यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले. माथानी साल्ढाना आयुष्यभर दाबोळीचा विमानतळ टिकवून ठेवण्यासाठी सक्रिय राहिले.

Thursday, April 26, 2012 AT 12:00 AM (IST)

वास्को, ता. 25 (प्रतिनिधी) - बायणा किनाऱ्याच्या सौंदर्यीकरणाच्या कामाचा शिलान्यास येत्या 4 तारखेला मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते होणार आहे.

Thursday, April 26, 2012 AT 12:00 AM (IST)

पणजी, ता. 25 (प्रतिनिधी) : फलोत्पादन महामंडळाचे माजी अध्यक्ष संकल्प आमोणकर यांच्या कार्यकाळातील घोटाळ्यांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती नवोदित अध्यक्ष किरण कांदोळकर यांनी दिली. फलोत्पादन महामंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर कांदोळकर म्हणाले, "गेल्या काही वर्षात फलोत्पादन महामंडळात गैरव्यवहार झालेले आहेत. गाळ्यांचे वितरण तथा भाजीच्या दर्जाबाबतही तक्रारी होत्याच. या सर्वांची चौकशी होणार आहे.

Wednesday, April 25, 2012 AT 09:56 PM (IST)

 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: