Last Update:
 
गोवा

नवी दिल्ली - डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण झाल्याने तेल कंपन्यांकडून पेट्रोलच्या दरात दोन रुपयांनी वाढ करण्यात येणार असल्याचे, सूत्रांनी सांगितले. आज (शनिवार) देशातील प्रमुख तेल कंपन्यांतील अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत पेट्रोल दरवाढीविषयी निर्णय होण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी ३१ मे रोजी पेट्रोलच्या दरात ७५ पैसे आणि डिझेलच्या दरात ५० पैशांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Sunday, June 16, 2013 AT 12:54 AM (IST)

अनुभवी प्राध्यापक यंदाही खासगी अभियांत्रिकीकडे आकर्षित पणजी, ता. 15 (प्रतिनिधी) ः फर्मागुढी येथील सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयातील रिक्त पदे नियमित पद्धतीने भरण्यात दिरंगाई होत असल्यामुळे यंदाही अनुभवी प्राध्यापक वर्ग खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांकडे वळण्याची चिन्हे आहेत.

Sunday, June 16, 2013 AT 12:52 AM (IST)

"जेडीयू'कडून आज होणार घोषणा पाटणा- गेल्या सतरा वर्षांपासून भारतीय जनता पक्षासोबत असलेली मैत्री संपुष्टात आणत संयुक्त जनता दल (जेडीयू) राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडण्याच्या पूर्णपणे मानसिकतेत आहे. भाजपची साथ सोडण्याची "जेडीयू'कडून आज(ता. 16) अधिकृतपणे घोषणा होण्याची औपचारिकता पार पाडली जाऊ शकते.

Sunday, June 16, 2013 AT 12:52 AM (IST)

लाखभर रुपयांचा मुद्देमाल पळविला, गॅस कटरचा वापर म्हापसा, ता. 15 (प्रतिनिधी) ः येथील सेंट अँथनी अपार्टमेंट व ला ब्रागांझा बिल्डिंग या दोन इमारतीत असलेली सहा दुकाने व एक बंद फ्लॅट फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे लाखभर रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. गॅस कटरची गॅस संपल्याने सांगोडकर यांच्या सोन्याच्या दुकानातील लोखंडी तिजोरी फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्याने चोरट्यांनी चार वकिलांची व इतर दुकाने फोडली.

Sunday, June 16, 2013 AT 12:51 AM (IST)

पिळर्ण सिटीझनचे सल्लागार ऍड. यतिश नायक यांची मागणी पणजी, ता. 15 (प्रतिनिधी) ः प्रादेशिक आराखडा तयार करण्यासाठी लोक सहभागाची तरतूद नगर व ग्राम नियोजन कायद्यात नाही, आराखड्याचे सर्वाधिकार मुख्य नगर नियोजक, अधिकाऱ्यांना आहेत. त्यासाठी सरकारने प्रादेशिक आराखडा 2021 खुला करण्याआधी नगर नियोजन कायद्यात दुरुस्ती करून लोक सहभागाच्या प्रक्रियेची तरतूद करावी अशी मागणी आज पिळर्ण सिटीझन फोरमचे सल्लागार ऍड. यतिश नायक यांनी केली.

Sunday, June 16, 2013 AT 12:50 AM (IST)

स्वतंत्र मराठी अकादमीचा निर्णय दुर्दैवी मान्यवर मराठीप्रेमींचे मत पणजी, ता. 15 (सांस्कृतिक प्रतिनिधी) ः नवी गोवा मराठी अकादमी स्थापन करण्याच्या व कालांतराने गोमंतक मराठी अकादमी ताब्यात घेण्याचा सरकारचा निर्णय दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त करून त्यामुळे आपण व्यथित झालो आहोत.

Sunday, June 16, 2013 AT 12:50 AM (IST)

नॅशनल क्राईम रिकॉर्डस ब्युरोच्या 2012 च्या अहवालात नोंद पणजी, ता. 15 (प्रतिनिधी) ः गोव्यात 2012 साली 200 महिलाविरोधी गुन्हे झाले व त्यांतील 55 गुन्ह्यांत आरोपी ओळखीचे होते, अशी माहिती नॅशनल क्राईम रिकॉर्डस ब्युरोने अलीकडेच प्रसृत केलेल्या अहवालात दिली आहे. राज्यातील महिलाविषयक गुन्ह्यांचे प्रमाण देश पातळीवरील गुन्हे पाहता कमी असले तरी ते वाढत आहेत, असे सरासरीचा आढावा घेताना दिसून येते.

Sunday, June 16, 2013 AT 12:50 AM (IST)

नवी दिल्ली, ता. 13 ः भारतीयांनी सोने खरेदीचा मोह किमान वर्षभर तरी टाळावा. असे झाल्यास अर्थव्यवस्थेला नाट्यमय व भरघोस बळ येईल, असे आवाहन केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी देशवासीयांना केले. डॉलरच्या तुलनेतील रुपयाची ताजी घसरण तत्कालिक असून, घाबरण्याचे कारण नाही. रुपया लवकरच सावरेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

Friday, June 14, 2013 AT 12:40 AM (IST)

पाटणा, ता. 13 ः बिहारमध्ये धनबाद- पाटणा इंटरसिटी एक्‍स्प्रेसवर माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन जण ठार झाले. मृतांमध्ये रेल्वे पोलिस दला(आरपीएफ)चा जवान, एक पोलिस जवान आणि एका विद्यार्थ्याचा समावेश आहे. एक जवान व इतर सहा प्रवासी जखमी झाले आहेत. "आरपीएफ'ची शस्त्रे लुटण्याच्या इराद्याने माओवाद्यांनी हल्ला घडविल्याचे मानले जात आहे.

Friday, June 14, 2013 AT 12:39 AM (IST)

पणजी, ता. 13 (प्रतिनिधी) ः राज्याला विशेष राज्याचा दर्जा म्हणजे त्याविषयक कायदे करण्यासाठी अधिकार द्या, अशी मागणी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याकडे केली आहे. त्यांनीही याविषयी सकारात्मक निर्णय करण्यासाठी कायदा मंत्रालयाचा सल्ला घेऊ, असे आश्वासन दिल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

Friday, June 14, 2013 AT 12:37 AM (IST)

पणजी, ता. 13 (प्रतिनिधी) ः राज्याला 3 हजार कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज द्यावे, अशी मागणी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्याकडे करण्यात येईल. येत्या 21 रोजी नियोजन आयोगासमोर राज्याचे वार्षिक आराखडा सादरीकरण आहे, त्याचदरम्यान अर्थमंत्र्यांची भेट घेतली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली. ते म्हणाले, खाणबंदीमुळे झालेल्या परिणामांची माहिती काल पंतप्रधान मनमोहनसिंग यांची भेट घेऊन काल दिली. मिकी पाशेको वगळता सर्वजण शिष्टमंडळात होते.

Friday, June 14, 2013 AT 12:36 AM (IST)

पणजी, ता. 13 (प्रतिनिधी) ः शाळांची वेळ अर्ध्या तासाने वाढविण्यात काहीही गैर नाही, असा निर्वाळा शिक्षणमंत्री या नात्याने मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिला. पर्वरी येथे पत्रकारांनी बोलताना त्यांनी शिक्षण हक्क कायद्यानुसार पूर्ण दिवस शाळा भरविणे बंधनकारक असताना कायदेशीर तरतुदींचे पालन करण्यासाठी अर्धा तास शाळांची वेळ वाढविणे आवश्‍यकच होते, याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, दोन लाख मुले शिकतात म्हणून सर्व पालकांशी याबाबत चर्चा करणे शक्‍यच नव्हते.

Friday, June 14, 2013 AT 12:36 AM (IST)

पंतप्रधानांना सादर केलेल्या निवेदनात मुख्यमंत्र्यांचा इशारा पणजी, ता. 12 (प्रतिनिधी) ः वाढत्या बिगर गोमंतकीयांच्या लोंढ्याबरोबरच निवृत्तीनंतर राज्यात स्थायिक होणाऱ्या भारतीयांमुळे 2021 पर्यंत गोमंतकीय आपल्याच भूमीत अल्पसंख्य होतील, अशी भीती राज्य सरकारने व्यक्त केली आहे.

Friday, June 14, 2013 AT 12:35 AM (IST)

नवी दिल्ली - आयपीएलमधील स्पॉट फिक्‍सींग प्रकरण व सट्टेबाजी प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर राजस्थान रॉयल्स व चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी केली असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी अध्यक्ष आय एस बिंद्रा यांनी आज (बुधवार) सांगितले. काल मंडळाच्या कार्यकारी मंडळाच्या झालेल्या बैठकीच्या आधी बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांना पत्र लिहून आपण ही मागणी केल्याचे बिंद्रा म्हणाले.

Wednesday, June 12, 2013 AT 10:41 PM (IST)

नवी दिल्ली- लग्नाचे वचन देऊन 20 वर्षांच्या तरुणीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या ललित चौहान (वय 22) याला दिल्ली न्यायालयाने दहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. डिसेंबर 2011 ते मार्च 2012 या काळात ललितने पीडित तरुणीवर बलात्कार केला. तरुणी गर्भवती राहिल्यानंतर त्याने लग्नाला नकार दिला. पीडित तरुणीने 4 सप्टेंबर 2012 मध्ये बालिकेला जन्म दिला. या प्रकरणात नवजात बालिकेच्या "डीएनए'ची चाचणी ग्राह्य धरत, न्यायालयाने चौहान याला दोषी ठरविले.

Wednesday, June 12, 2013 AT 10:40 PM (IST)

पाटणा - भारतीय जनता पक्षाचे (भाजप) वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांच्या राजीनाम्याचा विषय संपतोय तोपर्यंत, राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) घटक पक्ष असलेला संयुक्त जनता दल (जेडीयू) एनडीएला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री जेडीयू नेत्यांच्या झालेल्या बैठकीत भविष्यात एनडीएबरोबर राहण्याबाबत चर्चा झाली.

Wednesday, June 12, 2013 AT 10:40 PM (IST)

म्हापसा, ता. 12 (प्रतिनिधी) : येत्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्रितपणे निवडणूक लढवतील, तसेच गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा आम्ही जिंकू, असा ठाम विश्‍वास सावंतवाडीचे आमदार तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे गोवा प्रभारी दीपक केसरकर यांनी आज संध्याकाळी येथे व्यक्त केला. येथील एल कपितान टॉवरजवळील "ऍट्रिया' इमारतीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उत्तर गोवा जिल्हा कार्यालयाचे उद्‌घाटन केल्यानंतर आमदार श्री. केसरकर बोलत होते.

Wednesday, June 12, 2013 AT 10:38 PM (IST)

काणकोण, ता. 12 (प्रतिनिधी) ः काणकोण पालिकेचे नगराध्यक्ष अजय भगत यांच्याविरुद्ध दहापैकी सहा नगरसेवकांनी आज अविश्‍वास ठरावाची नोटीस दाखल केली आहे. या नगरसेवकांना नगरविकास संचालकांना ही अविश्‍वासाची नोटीस दिली असून, त्याची प्रत काणकोण पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिली आहे. पालिकेच्या नगरसेवकांना पालिकेच्या कामकाजात विश्‍वासात घेत नसल्याचे या नोटिशीत नमूद केले आहे.

Wednesday, June 12, 2013 AT 10:38 PM (IST)

दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या सदस्यांची मागणी मडगाव, ता. 12 (प्रतिनिधी) ः सरकारने दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीला जिल्हास्तरीय विकासकामांसाठी आवश्‍यकतेनुसार निधीचा पुरवठा करावा व जिल्हा पंचायतीतील अधिकार द्यावेत अन्यथा जिल्हा पंचायतच बरखास्त करावी, अशी मागणी सर्व सदस्यांनी आज मंडळाच्या बैठकीत केली. सरकारकडून वेळेवर निधी मिळत नसल्यामुळे जिल्हास्तरीय विकासकामे होत नाहीत. जिल्हा पंचायतीने कामाच्या निविदा जारी केल्या.

Wednesday, June 12, 2013 AT 10:37 PM (IST)

पणजी, ता. 10 (प्रतिनिधी) : गोव्याचा धर्मनिरपेक्ष राज्य हा चेहरा सध्याच्या राजवटीत धोक्‍यात आला आहे. तसेच सर्वांत कमी कर असलेले राज्य असे असलेले चित्रही पुसले जात आहे. सर्वांच्याच दृष्टीने ही चिंतेची बाब आहे. लोकांतही याबाबत अस्वस्थता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष यावेळी लोकांसोबत आहे व असेल, अशी माहिती पक्षाचे राज्य प्रभारी आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

Monday, June 10, 2013 AT 11:46 PM (IST)

पणजी, ता. 10 (प्रतिनिधी) ः येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाने प्रचारप्रमुख म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची निवड केली असली, तरी खूद्द भाजपमध्येच या निवडीमुळे झालेली दुफळी नरेंद्र मोदी रोखू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून देशाच्या एकतेची अपेक्षा कशी करायची, असा सवाल दक्षिण गोव्याचे कॉंग्रेस खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी केला आहे.

Monday, June 10, 2013 AT 11:46 PM (IST)

पणजी, ता. 10 (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या आयोजनासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. भाजपच्या प्रदेश समितीने हे पैसे आणले कुठून आणि नेमका खर्च किती केला, याचा तपशील जनतेसाठी आणखी काही जाहिराती देऊन जाहीर करावा, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रवक्ते सुदीप ताम्हणकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

Monday, June 10, 2013 AT 11:45 PM (IST)

पणजी, ता. 10 (प्रतिनिधी) ः भारत हे स्वयंभू हिंदू राष्ट्र असून हिंदू तत्त्वज्ञान, हिंदू धर्मशास्त्र, हिंदू संस्कृती आणि हिंदू समाज यांच्या रक्षणासाठी भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्यात यावे, असा एकमुखी ठराव द्वितीय अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात आज "जयतु जयतु हिंदूराष्ट्रम'च्या उद्‌घोषात संमत करण्यात आला. या अधिवेशनाची आज सांगता झाली.

Monday, June 10, 2013 AT 11:45 PM (IST)

पर्ये, ता. 8 (वार्ताहर) ः केरी-सत्तरी ग्रामपंचायत क्षेत्रातील लोकांना प्रक्रिया केलेले शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे म्हणून आणि पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी अंजुणे परिसरात तीन वर्षापूर्वी दोन एम.एल.डी. जलशुद्धीकरण प्रकल्पाची पायाभरणी तत्कालीन सरकारने केली होती. हा प्रकल्प पूर्णत्वास आला आहे, पण याची जलवाहिनी कालव्याला जोडणीचे काम अंतिम टप्प्यात आले असतानाच, ते रेंगाळत असल्याचे दिसून येत आहे.

Sunday, June 09, 2013 AT 12:03 AM (IST)

पणजी, ता. 8 (प्रतिनिधी) ः फोंड्यातील रामनाथी इथे सुरू असलेल्या हिंदू अधिवेशनात अल्पसंख्याकांना लक्ष्य केले जात असून, त्यामुळे राज्यातील धार्मिक सलोख्याला बाधा पोचण्याची शक्‍यता आहे. पण मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना या संघ परिवारातील मुलतत्त्ववाद्यांबद्दल सहानुभूती असल्याने ते याप्रकरणी कारवाई करत नसल्याचा आरोप कॉंग्रेस प्रवक्ते आलेक्‍स रेजिनाल्ड यांनी पत्रकार परिषदेत केला.  श्री.

Sunday, June 09, 2013 AT 12:02 AM (IST)

 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: