Last Update:
 
फॅमिली डॉक्टर

निसर्गाचे घड्याळ एका विशिष्ट पद्धतीने व एक विशिष्ट अंतर ठेवून चालते. त्याला प्रतिसाद देत आपण आपला आहार-विहार ठरवायला हवा. निसर्गनियमाशी विसंगत वागण्याने असंतुलन होते. प्रकृतीला न मानवणारे, ऋतुमानाला अनुकूल नसलेले अन्न सेवन करण्याने रोगाला निमंत्रण मिळते. संपूर्ण निसर्गाकडे लक्ष ठेवून, त्यातील बदलांकडे लक्ष ठेवून भौगोलिक वातावरण लक्षात घेऊन आहार-विहार ठरवावा लागतो, नाहीतर रोगांना सहज निमंत्रण दिल्यासारखे होते.

Sunday, April 15, 2012 AT 08:45 PM (IST)

केवळ पोटाचा आकार वाढतोय म्हणून शरीरात मेद वाढतोय, असं म्हणता येणार नाही. पोटाचा आकार वाढण्याची अन्य कारणेही असू शकतात. एखाद्या वेळी "उदर' या आजाराचे ते एक कारण असू शकते. त्यामुळे कोणताही निष्कर्ष परस्पर न काढता तज्ज्ञाकडून तपासणी करून घेणेच योग्य ठरेल. मा गच्या वेळी आपण मेदोरोगाची माहिती घेतली. शरीरात मेद साठायला लागला की पोटाचा आकार वाढायला लागतो, मात्र पोटाचा आकार वाढणे हे एखाद्या-दुसऱ्याच रोगाचेही एक कारण असू शकते.

Sunday, April 15, 2012 AT 08:44 PM (IST)

में दूला रक्तपुरवठा करणाऱ्या एखाद्या रक्तवाहिनीतून होणाऱ्या रक्तस्रावाला कवटीच्या आत होणारा रक्तस्राव असे म्हटले जाते. अशा प्रसंगी मेंदूला दुहेरी अपाय होतो. मेंदूच्या पेशींना रक्तपुरवठा होत नाही आणि मेंदूच्या पेशींवर रक्ताचा दाब येतो. असा आघात ज्यांचा रक्तदाब वाढलेला असतो त्या व्यक्तीमध्ये होण्याचा संभव जास्त असतो. वाढलेल्या रक्तदाबामुळे रक्तवाहिन्यांचे अस्तर कमकुवत होत जाते.

Sunday, April 15, 2012 AT 08:43 PM (IST)

क धी कधी मनात विचार येतो, भ्रमणध्वनी म्हणजेच आताच्या युवावर्गाच्या भाषेत सांगायचं म्हणजे मोबाईल ही वस्तू खरंच जादुई आहे ना! एखाद्या आगपेटीच्या आकाराचा हा भ्रमणध्वनी अख्ख्या जगाला आपल्या मुठीत ठेवतो. एखादी गोष्ट आपल्या मित्रमैत्रीणींना आत्ताच्या आत्ता सांगायची असेल, तर एक मेसेज पाठवली, की झालं काम! अगदी सुरवातीला जेव्हा हा भ्रमणध्वनी बाजारात आला होता, तेव्हा अगदी कंपासपेटीच्या आकाराचा होता.

Tuesday, February 07, 2012 AT 09:59 PM (IST)

च्यवनप्राश या प्रसिद्ध रसायनात आवळा हे मुख्य द्रव्य असते. च्यवनप्राश बनविण्याची पद्धतही शास्त्रोक्‍त असावी लागते. त्यासाठी ग्रंथोक्‍त योग्य पद्धत माहीत असणे व त्या पद्धतीने च्यवनप्राश बनविण्याचा अनुभव गाठीशी असणे आवश्‍यक आहे. च रकसंहितेमध्ये आवळ्यापासून बनविलेली निरनिराळी रसायने सांगताना सुरुवातीला सांगितलेले आहे.

Sunday, November 20, 2011 AT 08:30 PM (IST)

आयुर्वेद हा एक आगळा वेगळा सिद्धांत आहे, आयुर्वेद ही एक वेगळी विचारप्रणाली आहे. आयुर्वेदातील औषधे ही केवळ भौतिक किंवा रासायनिक वस्तूच्या मिश्रणासारखी नसतात. वनस्पतींना जीव तर असतोच पण त्यांना मन असते, प्राण असतो, त्यांना आत्मा असतो असे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे. त्यामुळे वनस्पतींचा स्वभाव विशिष्ट प्रकारे ठरलेला असतो.

Sunday, November 20, 2011 AT 08:21 PM (IST)

पा य वेडावाकडा पडल्याने घोट्याच्या सांध्यातील स्नायू अचानक ताणला जातो किंवा मुरगाळतो. फार वेळ उभे राहण्याने घोट्यातील स्नायू थकून सुजतात. अशा वेळी घोट्यामधे अतिशय वेदना होतात, मनुष्य चालू- फिरू शकत नाही. या रोगाला वातकंटक असे म्हणतात. नि रनिराळ्या वातव्याधींचे निदान कसे केले जाते याची माहिती आपण घेतो आहेत. "सायटिका' हा शब्द बहुतेक सर्वांच्या परिचयाचा असतो. सायटिका हे नाव मुळात पायातील एका मज्जातंतूचे (नर्व्ह) आहे.

Sunday, November 20, 2011 AT 08:15 PM (IST)

ल हान मुलांचे एका शब्दात वर्णन करायचे म्हटले तर "सळसळती ऊर्जा' एवढाच शब्द पुरेसा ठरेल. त्याहूनही पुढे जाऊन "वादळ'सुद्धा म्हणता येईल. आई-वडिलांना कळायच्या आत ही मुले एखाद्या उंच जागेवर चढून बसतील, नको ती बटणे दाबतील. (मुंबईतील एक लोकल ट्रेन चालू करण्याचा पराक्रम अशाच एका उपद्‌व्यापी मुलाने काही वर्षांपूर्वी केलाय.) अशा मुलांना सांभाळताना पालकांचा जीव मेटाकुटीला येतो.

Sunday, November 20, 2011 AT 08:12 PM (IST)

 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: