Last Update:
 
देश-विदेश

पणजी, ता. 7 - सामना संपण्यास 18 मिनिटे बाकी असताना भारताचा राष्ट्रीय कर्णधार सुनील छेत्री याने केलेला गोल गोव्याच्या चर्चिल ब्रदर्ससाठी मंगळवारी संध्याकाळी मौल्यवान ठरला. या गोलच्या बळावर त्यांनी कोलकत्याच्या मोहन बागानला 1-1 असे गोलबरोबरीत रोखले. बरोबरीच्या एका गुणामुळे स्पर्धेची एक फेरी बाकी असताना चर्चिल ब्रदर्सचे सहाव्या आय-लीग फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद निश्‍चित झाले. दुसऱ्यांदा दक्षिण गोव्यातील हा संघ भारताचा "चॅंपियन क्‍लब' बनला.

Wednesday, May 08, 2013 AT 03:00 AM (IST)

पणजी, ता. 7 - गोव्यातील खाणकाम सुरू करण्यासाठी शक्‍य ते सारे प्रयत्न केले जातील, असे आश्‍वासन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी आज नवी दिल्ली येथे गोवा खाण लोकांचा मंचच्या शिष्टमंडळाला दिले. खासदार फ्रान्सिस सार्दिन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज खाणी सुरू होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, यासाठी पंतप्रधानांची संसद भवनात सकाळी 11.30 वाजता भेट घेतली. या भेटीदरम्यान हे आश्‍वासन दिल्याची माहिती मंचाने येथे पत्रकातून दिली आहे.

Wednesday, May 08, 2013 AT 12:09 AM (IST)

पणजी, ता. 7 - सरकारी धोरणांमुळे व्यापारावर होत असलेल्या परिणामाच्या निषेधार्थ देशभरातील औषध विक्रेत्यांनी येत्या 10 मे रोजी संप पुकारला आहे. त्यात गोव्यातील औषध विक्रेतेही सहभागी होणार आहेत. केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशन गोवाचे अध्यक्ष लिंडन डिसिल्वा यांनी ही माहिती दिली. यामुळे येत्या शुक्रवारी औषधे मिळणार नाहीत. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी आपल्या नियमित सेवनात असलेली औषधे डॉक्‍टरच्या सल्ल्याने 10 मेपूर्वीच खरेदी करणे गरजेचे बनले आहे.

Wednesday, May 08, 2013 AT 12:08 AM (IST)

पणजी, ता. 7 - भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन 25 ते 27 मे दरम्यान गोव्यात घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. तिसवाडी की सासष्टी तालुक्‍यात हे अधिवेशन होईल हे मात्र ठरायचे आहे अशी माहिती मिळाली आहे. या अधिवेशनात लोकसभेच्या आगामी निवडणुकीविषयी चर्चा होणार असल्याने या अधिवेशनाकडे सगळ्यांचेच लक्ष आहे. या अधिवेशनाला भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

Wednesday, May 08, 2013 AT 12:07 AM (IST)

नवी दिल्ली / लखनौ -  गेला आठवडाभर संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार (यूपीए) आणि कॉंग्रेसच्या विरोधात गरळ ओकणारे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव आज "बॅकफूट'वर गेले. केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम्‌ यांनी उत्तर प्रदेश सरकारला विकासकामांसाठी हवी ती मदत देण्याची तयारी दर्शविल्यानंतर यादव यांचा "सूर' बदलला.

Saturday, March 30, 2013 AT 12:09 AM (IST)

नवी दिल्ली, ता. 29 ः देशात एच. डी. देवेगौडा यांच्यापासून आय. के. गुजराल व चंद्रशेखर यांच्यापर्यंतच्या तिसऱ्या आघाड्यांच्या सरकारांचा मुख्य आधार कॉंग्रेसच होता. आता तर तिसरी आघाडी हा शब्दच इतिहासजमा झाला आहे. यांचे सरकार कसे येणार? असा भाजपचा ताजा सवाल आहे. एका भाजप नेता म्हणाला, की या देशात तिसऱ्या आघाड्यांच्या झालेल्या प्रत्येक प्रयोगावेळी भाजपला "राजकीयदृष्ट्या अस्पृश्‍य' ठरवून आलेली ही सरकारे कॉंग्रेसच्याच टेकूवर उभी होती.

Saturday, March 30, 2013 AT 12:07 AM (IST)

नवी दिल्ली, ता. 29 ः पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदाही आपण तयार आहोत, असे संकेत देणाऱ्या डॉ. मनमोहनसिंग यांनी होळीनंतर लगेचच आपले खरे रंग दाखविले, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाने टीकेची झोड उठविली आहे. एका निरुत्साही नेत्याची प्रतिमा असलेले मनमोहनसिंग यांच्यातील अतिमहत्त्वाकांक्षी राजकारणी यानिमित्ताने दिसला आहे, असे टीकास्त्र रविशंकर प्रसाद यांनी आज सोडले.

Saturday, March 30, 2013 AT 12:06 AM (IST)

कोलकता, ता. 29 : श्रीलंकेतील तमीळ नागरिकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या मुद्यावरून संयुक्त पुरोगामी आघाडीतून (यूपीए) तमिळनाडूतील द्रमुक पक्ष बाहेर पडल्यानंतर तृणमूल कॉंग्रेसच्या ममता बॅनर्जी यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. अल्पमतात असलेले सरकार वाचविण्यासाठी "यूपीए'कडून प्रतिसाद मिळण्याची त्यांना आस लागली आहे.

Saturday, March 30, 2013 AT 12:05 AM (IST)

नवी दिल्ली, ता. 29 ः भारत आणि लिख्टेनस्टाइन यांनी करविषयक माहितीच्या देवाणघेवाणीच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. ऑस्ट्रिया व स्वित्झर्लंडचा शेजारी असलेला लिख्टेन्स्टाइन हा देश "टॅक्‍सहॅवन' म्हणजेच अतिश्रीमंतांचे अतिरिक्त किंवा बेहिशोबी पैसे गुंतविण्याचे स्थान म्हणून ओळखला जातो. गेल्याच वर्षी लिख्टेस्टाइन बॅंकेने त्यांच्याकडील काही संशयित भारतीयांची यादी भारत सरकारकडे पाठविली होती.

Saturday, March 30, 2013 AT 12:05 AM (IST)

डर्बन - तमिळनाडूतील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पातील पहिले युनिट पुढील महिन्यापासून कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे, आश्वासन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांना दिले. पाचव्या 'ब्रिक्‍स' परिषदेदरम्यान पुतीन यांच्याशी द्विपक्षीय संबंधांवर बोलताना मनमोहनसिंग म्हणाले, की एप्रिल महिन्यात कुडनकुलम प्रकल्पातील पहिले युनिट सुरू करण्यात येईल. तिसरे आणि चौथे युनिटही लवकरच कार्यान्वित करण्यात येईल.

Thursday, March 28, 2013 AT 12:01 AM (IST)

नवी दिल्ली - मुंबई बॉम्बस्फोटाच्या खटल्यात दोषी ठरलेला अभिनेता संजय दत्त याची शिक्षा माफ करण्याची मागणी करून या विषयावरील वाद-विवादांना तोंड फोडणारे प्रेस काउंसिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी आता याच खटल्यातील दोषी झैबुनिसा काझी या महिलेची बाजू घेतली आहे. काझी हिलाही न्यायालयाने पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा माफ केली जावी, अशी विनंती काटजू आता राष्ट्रपती आणि महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे करणार आहेत.

Thursday, March 28, 2013 AT 12:00 AM (IST)

चेन्नई - श्रीलंकेमधील तमीळ नागरिकांवरील अत्याचारामुळे भारतातील राजकारणही अधिक तापले असून आता स्वतंत्र तमीळ देशासाठी (ईलम) सार्वमत घ्यावे, असा प्रस्ताव आणण्याची मागणी तमिळनाडूच्या विधानसभेत मंजूर करण्यात आली आहे. देशाचे आंतरराष्ट्रीय धोरणच बदलण्याची मागणी करत तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनीच हा ठराव विधानसभेत मांडला आणि तो एकमताने मंजूरही झाला.

Wednesday, March 27, 2013 AT 11:59 PM (IST)

इस्लामाबाद/कराची- प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडून पाकिस्तानी सैन्याने केलेल्या 1999 च्या कारगिल कारवाईचा आपल्याला अभिमान असल्याची दर्पोक्ती पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी केली. कराचीतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कारगिल युद्धातील सहभागाबाबत होणाऱ्या टीकेवर विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी ही दर्पोक्ती केली. या कारवाईच्या काळात मुशर्रफ लष्करप्रमुख होते. नंतर तेव्हाचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे सरकार उलथवून ते सत्तेवर आले.

Wednesday, March 27, 2013 AT 11:58 PM (IST)

पणजी, ता. 26 (प्रतिनिधी) ः शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटकमधून गोव्यात प्रवेश करणाऱ्या वाहनचालकांकडून प्रवेश कर वसूल करणे 1 एप्रिलपासून सुरू होणार आहे. गोव्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांसाठीचे दरही निश्‍चित करण्यात आले आहेत. प्रवेश करातून दुचाकीधारकांना मात्र वगळण्यात आले आहे. हा कर गोळा करण्यासाठी 1 एप्रिल रोजी सुरवात व्हावी म्हणून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

Wednesday, March 27, 2013 AT 01:28 AM (IST)

नवी दिल्ली, ता. 18 ः इटलीने भारताला दिलेल्या निवेदनात व्हिएन्ना करारानुसार राजदूत आणि राजनैतिक प्रतिनिधींना असलेल्या विशेष संरक्षणाचा मुद्दा मांडण्यात आला असला, तरी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या पालनाचे बंधनही सरकारवर असल्याची बाब इटलीला कळविण्यात आल्याचे आज परराष्ट्र मंत्रालयातर्फे सांगण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने इटलीच्या येथील राजदूतांना भारत सोडून जाण्यास मनाई केलेली आहे.

Monday, March 18, 2013 AT 10:20 PM (IST)

नवी दिल्ली, ता. 18 ः कोळसा महाघोटाळा घडतानाच्या काळात पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हे त्याच खात्याचे मंत्री असल्याने डॉ. सिंग यांनी त्वरित पदाचा राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी आज भाजपने राज्यसभेत केली. संसदेच्या पटलावरून पंतप्रधानांचा राजीनामा प्रमुख विरोधी पक्षाने प्रथमच मागितला आहे. दुसरीकडे, द्रमुक व सप या मित्रपक्षांशी संबंध ताणले गेल्याने "यूपीए' सरकारची उलटगणती सुरू झाली आहे, असे भाकीतही भाजपने वर्तवले आहे.

Monday, March 18, 2013 AT 10:19 PM (IST)

चेन्नई, ता. 18 ः संयुक्त राष्ट्रांकडील श्रीलंकाविरोधी ठरावाच्या मुद्यावरून केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याची धमकी देणारे द्रमुकचे सर्वेसर्वा आपल्या भूमिकेवर अद्यापही ठाम आहेत. केंद्राकडून "डॅमेज कंट्रोल'चा भाग म्हणून पाठविण्यात आलेल्या तीन मंत्र्यांपुढेही करुणानिधी यांनी त्याचा पुनरुच्चार केला. केंद्राने आमच्या मागण्या मान्य करण्याचे आश्‍वासन दिले असल्याचे करुणानिधी यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.

Monday, March 18, 2013 AT 10:18 PM (IST)

विक्रम गोखले, आरती अंकलीकर-टिकेकर, संजय लोटन पाटील, उषा जाधव, शैलेंद्र बर्वे मानकरी नवी दिल्ली- भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये मानाच्या समजल्या जाणाऱ्या साठाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये पुन्हा एकदा मराठीची मोहर उमटली असून, सर्वोत्कृष्ट अभिनेता (विक्रम गोखले ः चित्रपट "अनुमती'), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (उषा जाधव ः धग) आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (संजय लोटन पाटील ः धग) यांनी पुरस्कार पटकावले आहेत.

Monday, March 18, 2013 AT 10:16 PM (IST)

सिडनी, ता. 12 ः शिस्तभंगाच्या कारवाई प्रकरणी संघातून वगळण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार शेन वॉटसन याने मायदेशी परतताच विमानतळावर आपण चुकल्याची कबुली दिली. मात्र, त्यासाठी झालेली शिक्षा खुपच कठोर असल्याचे देखील त्याने सांगितले.  भारतातील एकूण कारवाई संदर्भात बोलताना वॉटसन म्हणाला,""प्रशिक्षकांनी अपयशाची कारणमीमांसा करण्यास सांगितल्यानंतरही मी चालढकल केली. मी शंभर टक्के चूक आहे.

Wednesday, March 13, 2013 AT 12:53 AM (IST)

भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड पहिलाच गोमंतकीय चित्रपट पणजी, ता. 12 : गोमंतकीय चित्रपट "दिगंत' आता कान्स चित्रपट महोत्सवात झळकणार असून, नवी दिल्ली येथील चित्रपट महोत्सव संचालनायाद्वारे भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून हा चित्रपट पाठवण्यात आला आहे. या निवडीनंतर कान्समध्ये झळकणारा हा पहिलाच गोमंतकीय चित्रपट ठरला आहे.

Tuesday, March 12, 2013 AT 11:24 PM (IST)

मडगाव, ता. 11 - मडगाव पालिकेच्या सोनसोडो कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून हैदराबादचे कचरा तज्ज्ञ यू. एन. असनानी यांची नियुक्ती करण्याचा अंतिम निर्णय पालिकेच्या खास बैठकीत आज घेण्यात आला. सोनसोडोत कचरा यार्डात फोमेंतो रिसोर्सिसतर्फे सुरू करण्यात आलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पात सल्लागार व प्रशासनाचे ते काम पाहणार आहेत. पालिकेतर्फे त्यांना 17 लाख रुपये दिले जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष आर्थुर डिसिल्वा यांनी दिली.

Monday, March 11, 2013 AT 11:44 PM (IST)

पणजी, ता. 11 - गोव्यात येत्या 15 ते 19 मार्च दरम्यान होणाऱ्या प्रभात चित्रपट महोत्सवात पुरस्कारप्राप्त कुंकू, शेजारी, रामशास्त्री, माणूस, संत तुकाराम हे सामाजिक आशयावरील पाच चित्रपट पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. सर्व चित्रपट माकनिझ पॅलेसमध्ये दाखवले जाणार आहेत. गोवा मनोरंजन सोसायटीने प्रभात फिल्मस कंपनीच्या संयुक्त विद्यमाने भारतीय चित्रपटसृष्टीच्या शताब्दी वर्षानिमित्त प्रभातच्या प्रसिद्ध चित्रपटांचा महोत्सव आयोजित केला आहे.

Monday, March 11, 2013 AT 11:43 PM (IST)

पणजी, ता. 10 - गोव्याच्या मातीशी नाते असलेल्या अन गेली पंचवीस वर्षे लंडनच्या पार्लमेंटमध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवलेल्या कीथ वाझ या पार्लमेंट सदस्याने भारतातील मधुमेहींची वाढती संख्या पाहून आपणही काही तरी करावे म्हणून ध्यास घेतला आणि मधुमेहींची तपासणी करणारी एक फिरती बसच भारतात उपलब्ध केली. गोव्यात ही बसगाडी या आठवड्यात विविध भागात फिरणार असून, मधुमेहाबाबत जनजागृती करण्याबरोबरच मधुमेही रुग्णांची तपासणीही करण्यात येणार आहे.

Sunday, March 10, 2013 AT 11:52 PM (IST)

पणजी, ता. 5 - पोर्तुगालमध्ये व्हिसाशिवाय जाणे-येणे आणि पोर्तुगीज नागरिकाला व्हिसाशिवाय भारतात येणे-जाणे आता लवकरच शक्‍य होणार आहे. केंद्र सरकार व पोर्तुगाल सरकारमध्ये लवकरच तसा करार केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्यापार आणि गुंतवणूक करार मंडळाच्या बैठकीत यावर अलीकडेच चर्चा झाली आहे. केंद्रीय वाणिज्यमंत्री आनंद शर्मा आणि पोर्तुगालचे परराष्ट्र व्यवहारमंत्री पावलो पोर्तास यांनी याविषयी थेटपणे चर्चा केली.

Wednesday, March 06, 2013 AT 01:20 AM (IST)

नवी दिल्ली, ता. 4 - "यूपीए' सरकारची महत्त्वाकांक्षी थेट निधी हस्तांतरण योजनेची अंमलबजावणी संपूर्ण देशभरात करण्याचे सरकारचे नियोजन आहे. 2013 अखेरपर्यंत सर्व राज्यांत या योजनेची अंमलबजावणी केली जाईल, असा पुनरुच्चार ग्रामविकासमंत्री जयराम रमेश यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. वृद्ध, विधवा आणि अपंगांना दिल्या जाणाऱ्या पेन्शनच्या रकमेत वाढ करण्यासाठी निकषांत अनुकूल बदल करण्याचा सरकारचा मानस आहे.

Tuesday, March 05, 2013 AT 01:31 AM (IST)

 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: