Last Update:
 
क्‍लासमेट

होळी आणि रंगपंचमीने सर्व लोकांना न्हायला घालून ऋतुराज वसंत लोकांना सांगतो, पुन्हा नव्या वर्षात, नवीन सणांचे स्वागत करायला तयार राहा. निसर्गही त्यांच्या स्वागताची तयारी जोरात करतो. तो पहिला दिवस, पहिला सण म्हणजे "गुढीपाडवा' होय. यावर्षी गुरुवार 11 एप्रिल रोजी हा सण साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त विशेष माहिती- पहिला सण गुढीपाडवा हिंदू परंपरेनुसार चैत्र महिना हा नव्या वर्षाचा प्रारंभ मानला जातो.

Sunday, April 07, 2013 AT 12:05 AM (IST)

सरत्या थंडीत धुंद करणाऱ्या सुगंधाने वातावरणात दरवळून जाते. हा सुगंध कशाचा हे आपल्याला सांगायला नको, कारण सभोवताली आंब्याची झाडे या वेळी फुलांनी म्हणजेच आम्रमंजिरीने डवरलेली असतात. बालमित्रांचे तर आजूबाजूच्या झाडांकडे लक्ष असते. कोणत्या झाडाला केव्हा मोहर आलाय, आंबे कधी लागणार याकडे लक्ष लागलेले असते.

Sunday, March 17, 2013 AT 07:51 PM (IST)

मी आज तुम्हाला एका गोष्टीत दोन गोष्टी सांगणार आहे. या दोन्ही गोष्टीतली मुख्य पात्रे मुलेच आहेत. ती ही आमच्या शिबीराला नेहमी येणारी माझ्या ओळखीची. पण या दोन गोष्टीत अंतर आहे सुमारे वीस वर्षाचे. पूर्वी मी लहान मुलांसाठी शिबिराचे आयोजन करत असे. आम्ही खूप मजा करायचो त्यात दिवाळीच्यावेळी फराळ तयार करायचे शिबिर. रात्री शाळेत मुक्‍काम करून, रात्रभर सायकल चालवण्यासाठी... इतरांना शिकविण्यासाठी शिबिर. फक्‍त वेगवेगळ्या प्रकारे पत्ते खेळायला शिबिर.

Thursday, April 26, 2012 AT 10:26 PM (IST)

कुडतरीत कॉंग्रेसचे आलेक्‍स रेजिनाल्ड 4069 मतांनी विजयी.

Tuesday, March 06, 2012 AT 03:06 PM (IST)

छोट्या दोस्तांनो, पक्षी तुम्हाला काही नवे नाहीत. अगदी लहानपणीच्या चिऊ-काऊच्या घासापासूनच आपली आणि पक्ष्यांची मैत्री आहे. पण आपल्या सभोवताली आज असे कितीतरी पक्षी आहेत, की ज्यांची आपल्याला नावेही माहीत नाहीत. अशाच पक्ष्यांची माहिती करून देणारे "पक्षी जगत' हे सदर आजपासून खास तुमच्यासाठी सुरू होत आहे. या सदरामध्ये हे पक्षी राहतात कसे, खातात काय, त्यांची वैशिष्ट्ये काय अशी विविधांगी माहिती असणार आहे. चला तर मग सज्ज व्हा, या पक्षी जगताच्या सफरीला..

Thursday, December 15, 2011 AT 07:37 PM (IST)

चष्मा डोळ्यांना कमी दिसू लागले, डॉक्‍टरांचा सल्ला घेतला जातो. त्यानंतर आपल्याला आवश्‍यक असा चष्मा दिला जातो. परंतु डोळ्यांना वारा लागू नये किंवा डोळ्याचे संरक्षण करण्यासाठीही चष्मा वापरला जातो. "गॉगल' हाच शब्द मोठ्या प्रमाणात वापरला जातो. दर्जानुसार त्याची किमतही तितकीच अधिक असते. परंतु चष्मा काही प्राचीन काळापासून वापरात नाही. काचेच्या शोधानंतर आणि डोळ्यांना चांगले स्पष्ट दिसण्यासाठी, किंवा अक्षरे मोठी दिसण्यासाठी काचा वापरण्यास सुरवात झाली.

Thursday, December 15, 2011 AT 07:28 PM (IST)

"उभी मैत्री' कालपासून बाजूच्या घरात ठाकठोक, ठकाठक असे आवाज येत होते. त्याने एक दोनदा बाजूच्या घरात डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला. पण नीटसे काही समजले नाही. चालले असेल नेहमीचे रिपेअरींग... कळेल नंतर. असे समजून त्याने लक्ष दिले नाही. आणि आज सकाळी पाहतो तर काय? त्याचा जुना शेजारी जाऊन तिथे एक नवीन टकाटक शेजारी आलेला. या नवीन शेजाऱ्याचे दिसणे, त्यांचे पॉश कपडे, त्याचा लूक... सगळेच डिफरंट! एकदम हटके!! जुना शेजारी मात्र साध्याच कपड्यात.

Thursday, December 15, 2011 AT 07:25 PM (IST)

क्लासमेट २६ नोव्हेंबर२०११ पान १ पान २ पान ३ पान४ पान ५ पान ६ पान ७ पान ८

Saturday, November 26, 2011 AT 05:51 PM (IST)

रो जची 'सकाळ' 'चिंटू'सोबत मस्त धमाल करत उजाडते... महाराष्ट्रातील आणि जगभर पसरलेल्या मराठी समुदायाची गेल्या वीस वर्षांची ही परंपरा ! होय, तब्बल वीस वर्षे. अख्खी फॅमिली 'चिंटू' वाचतेय, असं दृष्य घरा-घरांत दिसतं...फॅमिलीतल्या प्रत्येकाला 'चिंटू' आपला वाटतो...यांत 'चिंटू'चं सारं सारं यश आहे. नाही का? रोजच्या जगण्याला किंचित हलकं करणाऱया 'चिंटू'चा येत्या सोमवारी (ता. 21) आहे बर्थडे ! आपला 'चिंटू' एकविसाव्या वर्षांत प्रवेश करतोय...

Saturday, November 19, 2011 AT 06:09 PM (IST)

गुरुत्वाकर्षणाचा शोध कसा लागला, त्याची कथा तुम्हा-आम्हा सर्वांनाच माहीत आहे. झाडावरून सफरचंद पडताना पाहिले आणि महान संशोधक न्यूटन यांना पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्‍तीचा सिद्धांत मांडण्याची प्रेरणा मिळाली. मात्र इतक्‍या वर्षांनंतर आता न्यूटन यांच्या याच सफरचंदाच्या झाडाने, हाच गुरुत्वाकर्षणाचा नियम मोडला आहे. नुसता मोडलाच नाही, तर चक्‍क ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर जाऊन अवकाश सफर करून आले आहे.

Thursday, June 03, 2010 AT 05:45 PM (IST)

 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: