Last Update:
 
मुख्य पान

पेट्रोलच्या दरात होणार दोन रुपयांनी वाढ?
प्रतिनिधी
Sunday, June 16, 2013 AT 12:54 AM (IST)
Tags: -
नवी दिल्ली - डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण झाल्याने तेल कंपन्यांकडून पेट्रोलच्या दरात दोन रुपयांनी वाढ करण्यात येणार असल्याचे, सूत्रांनी सांगितले.
आज (शनिवार) देशातील प्रमुख तेल कंपन्यांतील अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत पेट्रोल दरवाढीविषयी निर्णय होण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी ३१ मे रोजी पेट्रोलच्या दरात ७५ पैसे आणि डिझेलच्या दरात ५० पैशांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरील सरकारचे नियंत्रण हटविल्याने बाजारातील स्थितीप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चढ-उतार होत आहेत. डिझेलच्या दरात दर महिन्याला ५० पैशांची वाढ करण्याचा निर्णय तेल कंपन्यांनी यापूर्वीच घेतलेला आहे.

दिल्लीत सध्या पेट्रोलचे दर ६३.९९ पैसे असून, दोन रुपयांनी वाढ झाल्यास दर ६५.९९ पैसे होणार आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची गेल्या सहा आठवड्यापासून घसरण होताना दिसत आहे. त्याचे परिणाम तेलाच्या किंमतींवर होत आहेत.


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: